`संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरणातील पुराव्यात मंत्र्यांच्या सांगण्यावरून छेडछाड` - Fraud of Thackeray government in forensic report Ashish Shelar Mansukh Hiren | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

`संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरणातील पुराव्यात मंत्र्यांच्या सांगण्यावरून छेडछाड`

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

संजय राठोड, मनसुख हिरेन प्रकरणात पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत  चैाकशी व्हावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. 

मुंबई : माजी वनमंत्री संजय राठोड प्रकरणातील आँडिओ क्लीप आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. याबाबत शेलार यांनी टि्वट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या दोन्ही अहवालाबाबत ठाकरे सरकारची हेराफेरी सुरू असल्याचा आरोप करत शेलार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, या दोन्ही प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची चैाकशी व्हावी.

शेलार म्हणाले की, संजय राठोड प्रकरणात ऑडियो क्लिपशी छेडछाड केली जात आहे. सरकारमधील कुठल्या मंत्र्यांच्या सांगण्यावरुन होते? संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

मनसुख हिरेनचा खून झाला, त्यांचे जे शवविच्छेदन झालं त्यामध्ये काही गोष्टी या लपवल्या जात आहेत, काहींचा त्यामध्ये उल्लेख नाही, हिरेनच्या मृत्यूच्या बाबतीत काही पुरावे लपवले जात आहेत का, असं वर्तन सरकारच्या माध्यमातून पोलिस यंत्रणांचे होतंय का अशी आमची शंका आहे, तेव्हा सरकारने काही हेराफेरी करू नये.
 
निलंबित पोलीस आधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीत अनेक आश्‍चर्यकारक गोष्टी पुढे येत आहेत. वाझेंकडून जप्त करण्यात आलेल्या मर्सिडिज मोटारीत पाच लाख रूपये रोख, काही कपडे व नोटा मोजण्याची मशीन सापडल्याची खळबळजनक माहिती तपास करणाऱ्या ‘एनआयए’चे मुंबई प्रभारी अनिल शुक्ला यांनी दिली. मोटारीत सापडलेल्या कपड्यांमध्ये पीपीई किट असल्याबाबत स्पष्ट बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोटारीतून स्कॉर्पिओला वापरण्यात आलेल्या दोन नंबर प्लेट मिळाल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ही मोटार स्वत: वाझे चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून मोटारीचा मालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

यावर शेलार यांनी टि्वट केलं आहे, ते म्हणतात, "पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत लाखोंच्या नोटा आणि नोटा मोजायची मशीन सापडली ! एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती तो तिघाडीचा "किमान समान कार्यक्रम" हाच का तो? युरेका.. युरेका.. युरेका.."

अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. फडणवीस यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी मिळविलेल्या सीडीआरवर सावंत यांनी आक्षेप घेत फडणवीसांवर आरोप केला आहे. 'फडणवीस हे दोन आरोपींना पाठिशी घातल आहे,' असे टि्वट सावंत यांनी केलं आहे. 'फडणवीसांनी या गुन्ह्यात सहभागी होऊ नये,' असा सल्ला सावंत यांनी फडणवीसांना दिला आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख