स्वस्तात लस मिळवून देण्याच्या आमिषाने तुमची अशी होऊ शकते फसवणूक...

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या निमित्ताने आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक होऊ शकते.
 Fraud can occur under the name of vaccine .jpg
Fraud can occur under the name of vaccine .jpg

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या निमित्ताने आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक होऊ शकते, असा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना सायबर विभागाने (सायबर महाराष्ट्र) केल्या आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात विविध शासकीय, खासगी यंत्रणांचे नाव वापरून उपचार पद्धतीबाबत माहितीच्या नावाखाली नागरिकांना लक्ष्य करून त्यांची ऑनलईन फसवणूक झाली असल्याच्या घटना घटल्या आहेत.

जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीची निर्मिती झाली आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणास सुरु आहे. भारतात माञ लसींचा तुटवडा आहे. या परिस्थितीचा फायदा घेत शासकीय लसीकरणाचा कार्यक्रम महाराष्ट्रात नियमीत सुरू होण्याआधीच तुम्हाला स्वस्तात लस उपलब्ध करून देऊ, लसीचे आरक्षण, मोफत लसीकरण अशा विविध मधाळ, पण खोट्या जाहिराती समाजमाध्यमे, इंटरनेटवर प्रसिद्ध करून नागरिकांना आकर्षित केले जाऊ शकते.

त्यानंतर आगाऊ पैसे स्वीकारून लस न देता फसवणूक व मालवेअरच्या माध्यमातून नागरिकांची संवेदनशील माहिती मिळवून आर्थिक गंडा, इंटरनेट बँकिंगसाठी आवश्यक असलेले तपशील मिळवून फसवणूक, असे प्रकार घडू शकतात, असे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने सांगितले आहे.

ऑनलाइन भामटे गुन्ह्याची पद्धत बदलणार नाहीत. पद्धत तीच, फक्त निमित्त कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे असेल, असे सायबर महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत अन्य देशांप्रमाणे भारतातही उत्सुकता आहे. भारतात अन्य देशांच्या तुलनेत लसीची मागणी जास्त आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन विविध कंपन्यांची लस, त्याचे फायदे, किंमत, परिणाम आदी माहिती देण्याच्या निमित्तानेही भामटे नागरिकांच्या संगणक, मोबाईलमध्ये मालवेअर सोडू शकतात, अ‍ॅपद्वारे संवेदनशील माहिती चोरू शकतात. याच माहितीद्वारे हे भामटे तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढून तुम्हची फसवणूक करू शकतात, असे महाराष्ट्र सायबरचे पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव, यांनी सांगितले आहे. 

कोरोना लसीकरण आणि वितरण या संबंधित बातम्यांसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवा. लसीसंदर्भातील कोणत्याही बातम्यांसाठी सरकारने विकसित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवा. अशा घटना घडत असतील तर त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर द्या किंवा तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला भेट द्या. कोरोना लसीसंबंधी कोणत्याही संकेतस्थळावरून किंवा जाहिराती पाहून लस खरेदी करू नका. सोशल मीडियावर प्रसारित केलेले कोणतेही संदेश किंवा पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड करु नका, असे पोलिसांनी सांगितले आहे.

त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवण्याऐवजी भामटे भलतेच रसायन नागरिकांच्या हाती देऊ शकतात. अशा बनावट लसींच्या वापराने शरीरावर दुष्परिणामही संभवू शकतात, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अशाप्रकारे गुन्हे घडलेले नाहीत किंवा तशा तक्रारीही प्राप्त नाहीत. मात्र भामट्यांच्या गुन्हे पद्धतीचा अभ्यास केल्यावर लसींच्या निमित्ताने भामटे आमिष दाखवून नागरिकांसाठी सापळे रचू शकतात, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com