अर्णबच्या पोलिस कोठडीसाठी चार तासांहून अधिक काळ न्यायालयात युक्तिवाद सुरूच - four hour hearing for police custody of arnav goswami in Alibag | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णबच्या पोलिस कोठडीसाठी चार तासांहून अधिक काळ न्यायालयात युक्तिवाद सुरूच

महेंद्र दुसार
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

पोलिसांनी मारहाणा केल्याचा गोस्वामी यांचा दावा न्यायालयाने फेटाळला...

अलिबाग : `रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांची पोलिस कोठडी घेण्यासाठी चार तासांहून अधिक काळ सुनावणी सुरु राहिली. पोलिसांनी सायंकाळी पाच वाजता गोस्वामी यांना न्यायालयात दाखल केले होते. अनेक दावे-प्रतिदावे सरकारी बाजून आणि गोस्वामी यांच्या बाजूने करण्यात आले. रात्री नऊपर्यंतही यावरील निकाल न्यायालयाने दिलेला नव्हता.

पोलिसांवर मारहाणीचे अर्णब गोस्वामी यांनी केलेले आरोप कोर्टाने फेटाळले आहेत. अर्णब गोस्वामी यांच्यासह आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा यांनाही पोलिसांनी अलिबाग येथे कोर्टात सायंकाळी 7.00 वाजता हजर केले आहे. 

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने मुंबई पोलिसांच्या मदतीने बुधवार ( ता. 4 ) रोजी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतून त्यांच्या रहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर करण्यात आले. सकाळी 11.00 वाजता अर्णब गोस्वामी यास आलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. एक तास चौकशी केल्यानंतर प्रथम साडेबारा वाजता मुख्य न्याय दंडाधिकारी सुनैना पिंगळे यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील ऍड रुपेश महाकाळ यांनी सरकारची बाजू मांडली.

यावेळेस अर्णब गोस्वामी यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे सांगत वैद्यकिय तपासणीची मागणी केली होती. त्यानंतर दुपारी मेडीकल प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. ज्येष्ठ वकील अॅड. आबाद फोडा यांनी व्हीडीओ कॉन्फर्सींगव्दारे  युक्तीवाद करत कस्टडी रद्द करण्याची मागणी केली होती. अन्वय नाईक यां.च्या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांत  दोन वर्षा पूर्वी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक  हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहत होते. अन्वय यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख