मराठा आरक्षणासाठीचा दिल्लीतील पाया पक्का केला आहे : खासदार संभाजीराजे 

दिल्लीतील पाया पक्का करण्यासाठीच खासदारांना एकत्र करण्याची भूमिका घेतली आहे.
The foundation for Maratha reservation in Delhi has been laid : MP Sambhaji Raje
The foundation for Maratha reservation in Delhi has been laid : MP Sambhaji Raje

कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळविण्यासाठी दिल्लीतील पाया पक्का केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधवाने दिल्लीवर धडक मारण्याकरिता पूर्वतयारी युद्धपातळीवर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. 

सकल मराठा समाजातर्फे आयोजित व्यापक मेळाव्यात ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, "दिल्लीतील पाया पक्का करण्यासाठीच खासदारांना एकत्र करण्याची भूमिका घेतली. आता तिथे धडक मारण्यासाठी पक्के नियोजन लागेल. सारथी संस्थेला स्वायतत्ता मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तत्पूर्वी संस्थेबाबत प्रबोधन गरजेचे आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा समाजाला घडवू शकतो. त्याकरिता बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेला निधी लवकर मिळायला हवा.'' 

ते म्हणाले, "गरीब मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न आहे. मराठवाड्यात बहुजन म्हणजे दलित व मराठा म्हणजे वेगळा असा समज आहे. त्यामुळे बहुजन ही संकल्पना नेमकी काय, हे तिथल्या लोकांना सांगावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले,""आरक्षणाच्या लढाईत शाहू महाराजांनी नेतृत्व करावे. वडिलकीचा अधिकार घ्यावा. सर्व संघटनांना एकत्रित करण्याची त्यांच्यात ताकद आहे.'' 

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ""करवीर मतदार संघातील प्रत्येक मावळा आरक्षणाच्या लढाईत सहभागी होईल. आरक्षणासाठी जे आंदोलन पुकारले जाईल, त्याला आमचा पाठिंबा असेल.'' 

राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ""राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. सर्वोच्च न्यायालयात उणीव भरून काढावी. कारण समाजाला फार काळ आम्ही थोपवू शकणार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात एकही कर्ज थकीत नाही. प्रामाणिक व सचोटीने कर्ज घेणारा मराठा समाज आहे. आरक्षणाची लढाई या गुणांच्या जोरावर लढत आहोत.'' 

इंद्रजित सावंत यांनी सारथी संस्थेला 130 कोटी बजेट देऊन उपयोग नाही, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले, ""पोकळ लढाया लढण्यापेक्षा घटनेत बदल आवश्‍यक आहे. त्याकरिता दिल्लीला तत्काळ धडक मारावी लागेल. त्याची सुरुवात कोल्हापूरपासून करायला हवी. हे आंदोलन दिल्ली तख्ताला जाग आणणारे असेल.'' 

ऍड. गुलाबराव घोरपडे, भय्या माने, नगरसेविका रुपाराणी निकम यांनी सर्जेराव पवार (शिरोळ), नितीन कळभर (कागल), मारुती मोरे (आजरा), विष्णू जोशीलकर (चंदगड), शशिकांत पाटील (कोल्हापूर), सुनील पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर (जिल्हा परिषद सदस्य), अमरसिंह पाटील (पन्हाळा), शैलेश भोसले (महिला आघाडी), रवी पाटील (वडणगे), लाला गायकवाड (कोल्हापूर), प्रल्हाद पाटील (घुणकी), कमलाकर जगदाळे (कोल्हापूर), विजय शिंदे (पेठवडगाव), अमर पाटील (शाहूवाडी), समाधान इंदळकर (मुरगूड) यांनी सूचना केल्या. 

खासदार धैर्यशील माने व आमदार चंद्रकांत जाधव यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्राद्वारे कळविले. हर्षल सुर्वे यांनी स्वागत केले. संदीप देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 


सरकारने भरपाई द्यावी; कोल्हापूरकरांनी मदत करावी 

राज्यात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, तर कोल्हापूरकरांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com