परमबीर सिंह यांची बाजू मांडणारे महेश जेठमलानी यांना राज्यसभेची लॅाटरी..

जेठमलानी हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे वकील आहेत.
Sarkarnama Banner - 2021-06-01T160844.918.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-01T160844.918.jpg

नवी दिल्ली : ख्यातनाम वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. महेश जेठमलानी यांनी याबाबत माहिती दिली आहे.  former union minister ram jethmalani s son mahesh jethmalani nominated to rajya sabha

ते म्हणाले की राज्यसभा सदस्यांसाठी नामांकन देण्यात आल्याची सूचना मिळाली आहे. महेश जेठमलानी यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अनेक हायप्रोफाईल खटले चालविले आहेत. सध्या देशाच्या राजकारणात गाजत असलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणात ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे  वकील आहेत.

महेश जेठमलानी यांना दिवंगत खासदार रघुनाथ महापात्र यांच्या रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे. महापात्र यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.  राज्यसभा खासदार म्हणून महेश जेठमलानी यांचा कार्यकाल मे 2024 पर्यंत राहणार आहे. सध्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहे. स्वपन दासगुप्ता यांनी गेल्या मार्चमध्ये राजीनामा दिला आहे. भाजपने त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरविले होते. तर महापात्र यांचे निधन झाले आहे.  
  
महेश जेठमलानी हे देशातील सर्वात महाग वकीलांपैकी एक आहे. 2009 मध्ये त्यांनी प्रिया दत्त यांच्या विरोधात लोकसभेची निवडणुक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला आहे. साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आदी क्षेत्रातील  १२ जणांची नियुक्ती ही राज्यसभा खासदारासाठी करण्यात येते. ही नियुक्ती राष्ट्रपती करतात.  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित अॅट्रोसिटीच्या प्रकरणात सध्या उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणात महेश जेठमलानी हे परमबीर सिंह यांची बाजू मांडत आहेत. देशातील अनेक महत्वाचे खटले लढविले प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांचे ते पुत्र होत. राम जेठमलानी हेही राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी कायदामंत्री म्हणून काम पाहिले होते.  

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरही पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरुच आहे. निवडणुकीपूर्वी तुणमूल कॅाग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा तुणमूलमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले दीपेंदू बिश्वास हे स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिलं आहे.  भावनेच्या भरात आपण भाजपमध्ये जाण्याच्या चुकीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ममता दीदींना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी बशीरहाट दक्षिण परिसरातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वी सोनाली गुहा, दीपेंदू बिस्वास, रविंद्रनाथ भट्टाचार्य, जटू लाहिडी, शीतल सरकार, सरला मुर्मू आदींनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण निवडणुकीनंतर सोनाली गुहा आणि सरला मुर्मू आणि दीपेंदू बिश्वास यांचा भाजपमध्ये जाऊन अपेक्षाभंग झाला. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com