सुरेशदादा जैन यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ  - Former minister Gulabrao Deokar, Sureshdada Jain's difficulty increased | Politics Marathi News - Sarkarnama

सुरेशदादा जैन यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

सुरेशदादा जैन, राजा मयूर,  चंद्रकांत सोनवणे, कैलास सोनवणे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

जळगाव : महापालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेच्या स्थागितेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे आता या खटल्यातील अन्य आरोपींच्या शिक्षेच्या स्थागितीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक आजी, माजी नगरसेवकांना  धुळे न्यायालयात शिक्षा सुनावली गेली. या प्रकरणात शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. मात्र, यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेच्या स्थगिती विरोधात पवन ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका करून आव्हान दिले आहे.

त्यामुळे सध्या देवकर यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे  आता या प्रकरणातील  इतरांच्या शिक्षेला देखील स्थगितीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात सुरेशदादा जैन, राजा मयूर,  चंद्रकांत सोनवणे, कैलास सोनवणे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा कलाटणी घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : महसूल वाढीची युक्ती... वाळू लिलावांची संख्या वाढवणार !
 नाशिक : नाशिक विभागाला राज्य शासनाने जमीन व गौण खनिज महसुल उत्पन्नाचे ७२८ कोटींचे उद्दीष्टे दिले आहे. त्यामुळे  विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत वाळू लिलावांची सख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यंदा पाऊस, अतिवृष्टी आणि नदीत पाणी असल्याने वाळू साठ्याचा अंदाज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु अशा परिस्थितीत पारंपारिक पद्धतीचा वापर करुन वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.  नियम व दंडाची कारवाई सक्त केल्यावर देखील विविध भागात वाळू चोरीच्या घटना घडतच असतात. या स्थानिक वाळूचोरीला त्याने आळा बसण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, कोरोना काळात महसूल विभागाचा उत्पन्नाच्या कामांवर परिणाम झाला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख