माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन - former indian attorney general soli sorabjee died due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

देशभरामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असून मृतांचा आकडाही कमी होताना दिसत नाही.

नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असून मृतांचा आकडाही कमी होताना दिसत नाही. आज कोरोनामुळे भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर मागील आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. 

सोली सोराबजी 91 वर्षांचे होते. त्यांनी 1953 पासून वकिली सुरू केली होती. त्यांना 1971 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता होते. भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून त्यांची 1989 मध्ये नियुक्ती झाले. ते जवळपास वर्षभर या पदावर होते. त्यानंतर दुसऱ्यांचा 1998 ते 2004 या कालावधीत ते या पदावर होते. सोराबजी यांची 1997 मध्ये नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियक्ती झाली होती. 

दरम्यान, सोराबजी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'सोराबजी यांच्या निधनामुळे कायदा व्यवस्थेतील एक आदर्श व्यक्तीमत्व हरपले आहे. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये महत्वाचे बदल घडविणाऱ्यांपैकी ते एक होते,' अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'सोली सोराबजी हे एक उत्तम वकील आणि बुध्दीमानी होते. कायद्याच्या माध्यमातून गरीबांची मदत करण्यासाठी ते पुढे असायचे. भारताचे अॅजर्नी जनरल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामासाठी ते लक्षात राहतील. त्यांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले आहे.'

चोवीस तासात साडे तीन हजार मृत्यू

देशात मागील चोवीस तासांत 3 हजार 498 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 3 लाख 86 हजार 452 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सुमारे 1 कोटी 87 लाखांवर पोहचला आहे. तर दोन लाखांहून अधिक मृत्यू झाले असून सध्या सुमारे 31 लाख 70 हजार सक्रीय रुग्ण आहेत.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख