पूर्वी गरीब सरकारच्या मागे धावायचे आताचे सरकार लोकांजवळ जातेय : नरेंद्र मोदी  - Former government wants to run after poor government: Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

पूर्वी गरीब सरकारच्या मागे धावायचे आताचे सरकार लोकांजवळ जातेय : नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

मध्यप्रदेशात पावणेदोन लाख लोकांना स्वत:चे आणि हक्काचे घर आज मिळाले आहे.

नवी दिल्ली : "" पूर्वी गरीब लोक सरकारच्या मागे धावत होते, आता मात्र सरकार लोकांच्या जवळ जात आहे. आता कोणाच्या इच्छेनुसार लिस्टमध्ये नाव टाकायचे आणि काढायचे हे होत नाही. आता सरकारच्या कारभारात पारदर्शकता आली आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

मध्यप्रदेशात पावणेदोन लाख लोकांना स्वत:चे आणि हक्काचे घर आज मिळाले आहे. पंतप्रधान आवाज योजनेद्वारे ही घरे सरकारने आज दिली आहे. गृहप्रवेशाचा कार्यक्रम मध्यप्रदेशात आयोजित केला होता.

यावेळी पंतप्रधानांनी व्हिसीवरून घर मिळाल्यांचे अभिनंदन केले. जर कोरोना नसता तर आज मी मध्यप्रदेशात तुम्हाला घराच्या चाव्या देण्यासाठी आलो असतो असेही मोदी यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे नाव न घेता या पक्षाच्या एकूण कारभारावरही त्यांनी टीका केली. 

मोदी म्हणाले, की पूर्वी गरीब लोक सरकारच्या मागे धावत होते, आता मात्र सरकार लोकांच्या जवळ जात आहे. आता कोणाच्या इच्छेनुसार लिस्टमध्ये नाव टाकायचे आणि काढायचे हे होत नाही. आता सरकारच्या कारभारात पारदर्शकता आली आहे.

येणाऱ्या दिवाळीचा सण पाहता आपला उत्साह आणि आनंद घर मिळाल्याने द्विगुणीत होईल असा मला विश्वास वाटतो. जर कोरोना नसता तर आपला प्रधानसेवक आपल्याबरोबर आपणास दिसला असता हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

यावेळी मध्यपदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीही उपस्थित होते. आज पावणेदोन लाख लोकांना स्वत:चे घर मिळाल्याने आपणासही आनंद झाल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख