आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती चिंताजनक  - Former Assam Chief Minister Tarun Gogoi is in critical condition admitted in hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती चिंताजनक 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (वय 86) यांना आज व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गोगाई यांना श्वसनाचा त्रास होत आहे.

गुवाहाटी : प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (वय 86) यांना आज व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गोगाई यांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यांचे अनेक अवयव काम करत नाही. गोगोई सध्या बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली आहे. 
 
काही दिवसांपूर्वीचतरुण गोगोई हे कोरोनामुक्त झाले आहेत. काल (शनिवारी)  त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पुढील 72 तास अतिशय महत्वाचे असल्याचे  आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले. एम्सच्या डॉक्टर आणि GMCH ची टीम सातत्यानं आपल्या संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच गोगोई यांचा परिवारही संपर्कात आहे आणि त्यांच्या अनुमतीनेच सर्व उपचार सुरु असल्याचं हेमंत बिस्वा यांनी सांगितलं.

गोगोई यांच्यावर डॉक्टरांकडून औषधोपचार आणि अन्य उपचारांद्वारे उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर डायलिसिसही केलं जाण्याची शक्यता हेमंत बिस्वा यांनी वर्तवली आहे. ता. 25 ऑक्टोबरला तरुण गोगोई हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

देशात शनिनारी दिवसभरात 45 हजार 209 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90 लाख 95 हजार 807 वर जाऊन पोहोचली आहे. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 40 हजार 962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल दिवसभरात 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 

हेही वाचा : महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचे कोरोनावरून राजकारण.. 
मुंबई : "महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे.," अशी टीका सामनातून खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' या सदरात केली आहे. मुंबईतील भाजप नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते ते कोणत्या आधारावर? मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे. मात्र त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही. हे क्रौर्य आणि अमानुषता आहे. सरकारचे काही निर्णय मतभेदाचे विषय ठरू शकतात, पण प्रत्येक निर्णयाला विरोधच केला पाहिजे, प्रसंगी लोकांचे जीव गेले तरी चालतील हे धोरण घातक आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख