आश्वासन पाळा, अन्यथा आंदोलन..उर्जामंत्र्यांना विनायक मेटेंचा इशारा - Follow the promise, otherwise agitation .. Vinayak Mete's warning to the energy minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आश्वासन पाळा, अन्यथा आंदोलन..उर्जामंत्र्यांना विनायक मेटेंचा इशारा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

राज्यातील वीज कर्मचार्‍यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.

मुंबई : महावितरणच्या भरती प्रक्रियेत कोणावर अन्याय होणार नाही, असा आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं असल्याचं मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. शिवाय उर्जामंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.  

राज्यातील वीज कर्मचार्‍यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. तसेच ते यावर्षीही मिळणार आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे. आदेशाची अमंलबजावणी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता हे करणार आहेत. 

लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
 

दरम्यान, बोनससह अन्य मागण्यांसाठी विविध वीज कर्मचारी संघटांना अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहुन सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग वगळून नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, अशी जाहिरात महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना इशारा दिला आहे. 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भरती प्रक्रियेबाबत मराठा समाज नाराज नसल्याचं म्हटलंय. मराठा समाजाच्या काही मुलांना ओपनमध्ये तर काहींना SEBC मध्ये सामावण्यात आलं असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाज महावितरणच्या भरती प्रक्रियेबाबत नाराज नसल्याचं म्हटलंय. त्यावर नितीन राऊत यांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. तसंच भरती प्रक्रियेतील उमेदवारांना सावध पवित्रा घेण्याचं आवाहनही मेटे यांनी केलं आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख