शेतकरी म्हणतात, "अजित पवार यांनी आमचा भ्रमनिराश केला : संभाजीराजे - Flood affected farmers present grievances to Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी म्हणतात, "अजित पवार यांनी आमचा भ्रमनिराश केला : संभाजीराजे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील महापूर ग्रस्त गावांना खासदार संभाजीराजे यांनी भेट दिली. तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. "आपण मला आपल्या अडचणी समजावून सांगा. मी आपला आवाज म्हणून काम करेन. केंद्र शासन असो की राज्य शासन, दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो," असे ते म्हणाले. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे संभाजीराजें यांच्याकडे मांडले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचा भ्रमनिराश केल्याचे शेतकऱ्यांनी संभाजीराजे यांना सांगितले. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले की केंद्र सरकार ने राज्याला निधी दिल्याशिवाय आम्ही मदत करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत होते.

खासदार संभाजी राजे शेतकऱ्यांना म्हणाले की आपण मला सांगा मी काय केलं पाहिजे. शेती बाबत मला कमी माहिती आहे. आपण मला आपल्या अडचणी समजावून सांगा. मी आपला आवाज म्हणून काम करेन. केंद्र शासन असो की राज्य शासन, दोन्ही सरकारांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो
 
संभाजीराजेंच्या पंढरपूर तालुक्यातील महापूर ग्रस्त गावांच्या भेटी रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या. प्रत्येक गावातील शेतकरी, गावकऱ्यांची राजेंनी आपल्या गावाला भेट देऊन गाऱ्हाणे ऐकावे अशी इच्छा दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे पंढरपुर मध्ये थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे युवक संघटनेच्या वतीने स्वागत केले. यावेळी अण्णा भाऊ साठे यांची जगप्रसिध्द असणारी फकिरा कादबंरी देऊन समाज बाधंवानी त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा : शरद पवारांच्या दैाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा..
 
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आला आहे. 18 व 19 तारखेला जिल्ह्यातील तुळजापुर, उमरगा व परंडा तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे नियोजन आहे.   पवार देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी गारपीठीने शेतकरी उध्द्वस्त झाला होता, तेव्हाही पवार पहाटेच चिखल तुडवित नुकसान झालेल्या पिकाचे पाहणी करत होते. त्यांनी तिथूनच पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोनवरुन परिस्थितीची माहिती दिली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना पवार यांनी मदतीचा हात दिला होता, यामुळे आताही ते अशाचप्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख