श्रीराम मंदीरासाठी पंकजा मुंडेंचे पाच लाख..फडणवीसांकडून एक लाखाचा निधी...

विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदीरासाठी एक लाखाचा निधी दिला आहे.
dfpm29.jpg
dfpm29.jpg

मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभर निधी संकलन मोहिम राबविण्यात येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाखाचा निधी श्रीराम मंदीरासाठी दिला आहे. तर विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदीरासाठी एक लाखाचा निधी दिला आहे.  

अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपला सहभाग नोंदवित 1 लाख 1 रूपयांचा धनादेश समर्पित केला.

 देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार आहे. "12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होतेय. यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा," असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

काही दिवसापूर्वी माजलगाव येथे एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी या निधीचा धनादेश संकलकांकडे सुपूर्द केला. राम मंदिर निर्माणासाठी जिल्हयातून जास्तीत-जास्त निधी संकलन करावे असे, आवाहन मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान जिल्ह्यात गावा- गावात राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची बैठक पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगावच्या सिद्धेश्वर संकुलात पार पडली. अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.

या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदडा, मोहन जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी, अमरनाथ खुर्पे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनीही बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निधी संकलनाचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com