मनसे नेते म्हणतात, "बॉलीवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे..."   - First reaction from MNS regarding drugs eagle in Sushant Singh case | Politics Marathi News - Sarkarnama

मनसे नेते म्हणतात, "बॉलीवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे..."  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

"बॉलीवूडला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे," असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी  केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाज उठविल्यावर आता मनसेनेही बॅालीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात उडी घेतली आहे. "बॉलीवूडला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे," असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज केला आहे.

अमेय खोपकर यांनी याबाबत टि्वट केले आहे. अभिनेता सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अॅगलबाबत मनसेकडून प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. अमेय खोपकर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे.

अमेय खोपकर म्हणाले की यापूर्वीही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचे घटना झाल्या आहेत. काहीना शिक्षा देखील झाल्या. मात्र, कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. सुशांतसिंह प्रकरणात तर संपूर्ण फिल्मसिटीचं मुंबईबाहेर हलविण्याचा कुटील डाव रचला जात आहे. 

याबाबत काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की काही दिवसांपासून काही ठराविक व्यक्तींकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत. 

हेही वाचा : मुंबईच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्र आहे, मुख्यमंत्री साहेब आता तरी बाहेर पडा..
 
लातूर  मुंबईत दोन तास वीज गेली तर राज्यभरातील मिडिया आणि राज्य सरकारने त्याची तातडीने दखल घेतली. इकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं, जमीनी वाहून गेल्या तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. जिल्ह्यात ्अजूनही सरकारचा एकही प्रतिनिधी झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेला नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आता मुंबईच्या बाहेर पडावे, मुंबई बाहेर उर्वरित महाराष्ट्र आहे याची जाणीव ठेवून त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. उभी पिकं वाहून गेली, काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या, पावसाच्या पाण्याचे शेतातील माती वाहून नेल्यामुळे पुढील काही वर्ष या शेतात काही पिकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पंचनाम्याची कारणे देऊन शेतकऱ्यांच्या मदतीला अधिक वेळ करू नका. सरसकट एकरी पन्नास हजारांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांला तातडीने दिलास द्या, असे आवाहन देखील निलंगेकर यांनी केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख