रामदेव बाबा पुन्हा अडचणीत..IMA च्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल..

रामदेव बाबा यांनी अॅलोपॅली उपचार पद्धतीला फालतू म्हटलं होते.
ramdev baba.jpg
ramdev baba.jpg

रायपूर : योगगुरू रामदेव बाबा Ramdev Baba यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपॅथी औषधांवर त्यांनी टीका केली होती. याप्रकरणी आता रायपूर येथे (छत्तीसगड) रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेने याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. fir case registered against baba ramdev raipur police

रामदेव बाबा यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अॅलोपथीच्या औषधांविषयी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप रामदेव बाबांवर करण्यात आला आहे. रायपुर पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली आहे. डाँ. राकेश गुप्ता यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत रामकृष्ण यादव अर्थात रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ता. २६ मे रोजी रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा व्हिडिओ डाँ. राकेश गुप्ता आणि आयएमएच्या सदस्यांनी तक्रारीमध्ये दाखल केला आहे.  यापूर्वीही दिल्ली आणि पटना येथे रामदेव बाबा यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

रामदेव बाबा  यांनी अॅलोपॅली उपचार पद्धतीला फालतू म्हटलं होते. त्यावरुन देशभरात अॅलोपॅथीच्या डॅाक्टरांनी रामदेव बाबा यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी नाराजी व्यक्त करुन त्यांना खरमरतीत पत्र लिहिलं होते. त्या पत्राला आज रामदेव बाबा यांनी उत्तर दिले आहे. मी माझे विधान मागे घेतो, असं त्यांनी म्हटलं आहे. पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांनी एका शिबिरात  अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. व्हॅाट्स अॅप मेसेज वाचून दाखवताना त्यांनी लाखो लोक अॅलोपॅथीच्या औषधांमुळं मरत आहेत, असं वक्तव्य केलं. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना तापासाठी दिल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू या औषधालाही फालतू म्हटलं. रामदेव बाबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर IMA ने त्यावर आक्षेप घेतला.

'संपूर्ण देशवासियांसाठी कोरोना काळात दिवस-रात्र लढणारे डॅाक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवासमान आहेत. रामदेव बाबांच्या वक्तव्याने त्यांचा अपमान झाला असून देशवासियांच्या भावनाही दुखावल्या आहेत. त्यामुळे आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केलं होतं. अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे विधान रामदेव बाबा यांनी केलं होतं.  
  Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com