मास्कविना बाहेर पडल्यास आता दोन हजारांचा दंड..  - A fine of Rs 2,000 now if you go out without a mask  Announcement by Chief Minister Arvind Kejriwal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

मास्कविना बाहेर पडल्यास आता दोन हजारांचा दंड.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

यापुढे कोणी मास्कविना फिरताना आढळल्यास त्यांना सध्या पेक्षा चौपट जास्त म्हणजे दोन हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत यापुढे कोणी मास्कविना फिरताना आढळल्यास त्यांना सध्या पेक्षा चौपट जास्त म्हणजे दोन हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे. मुख्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानी आज ही घोषणा केली. यापूर्वी दंडाची रक्कम 500 रूपये होती. दरम्यान छटपूजेवरून राजकारण करू नका, असेही आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांना केले आहे.

कोरोना काळात वारंवार इशारे देऊनही मास्क न लावताच बिनदिक्कत बाहेर फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी दिल्ली सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. यंदाच्या दिवाळीत राजधानीतील बाजारपेठांमध्ये एकच गर्दी उसळली व ऐन दिवाळीतच कोरोनाने दिल्लीवर पुन्हा हल्ला चढविला. गेले आठवडभर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 7 ते 8 हजारांच्या व रोजच्या मृतांची संख्या शंभराच्या वर घरात गेली आहे. या महामारीने दिल्लीत अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. परिस्थिती सुधारली नाही तर नजिकच्या काळात पुन्हा मिनी लॉकडाऊन लावण्याशिवाय सरकारकडे गत्यंतर नसेल असे दिसत आहे. 

लस येत नाही तोवर कोवीड-19 विषाणूपासून लढण्यासाठी अत्यावश्‍यक त्या आरोग्य त्रिसूत्रीच्या पालनाकडे दिल्लीत अनेक जण सर्रार दुर्लक्ष करताना आढळत आहेत. मास्क न वापरणे, मास्कऐवजी नुसताच रूमाल किंवा उपरणे कसेबसे गुंडाळणे असे प्रकार करणाऱ्यांची मोठी संख्या दिसत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने मास्क न लावल्याबद्दलचा दंड थेट चौपटीने वाढवून तो दोन हजार रूपये केला आहे. सरकारने नायब राज्यपालांसह मिळून हा निर्णय घेतल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले. 

छटपूजेवरून दिल्लीत राजकारण सुरू आहे. केजरीवाल यांनी, केवळ आरोग्याच्या कारणावरून व जीव वाचविण्यासाठीच सरकारने व्यापक पातळीवर छटपूजेला यंदा परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयानेही, जिवंत राहल तरच सण साजरे कराल, असे सांगून दिल्ली सरकारच्या निर्णयाला पाठबळ दिले होते. केजरीवाल यांनी यावर्षी छटपूजा घरीच करण्याचे आवाहन केले.

अनेक राज्य सरकारांनही यंदा छटपूजेवर प्रतिबंध घातल्याचे त्यांनी सांगितले. यंदा घरीच छटपूजन करा, असे आवाहन केले. कोरोना काळात गर्दी जमविणाऱ्या छटपूजेसारख्या उत्सवांना केजरीवाल सरकारने परवानगी नाकारल्यावरून दिल्ली भाजपने आंदोलने सुरू केली आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी काल केजरीवाल यांच्याबद्दल नमकहराम व अन्य अपशब्दांचा वापर केला होता. केजरीवाल यांनी कोणाचा नामोल्लेख न करता, यावरून राजकारण करू नये असे आवाहन केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख