वरुण सरदेसाई अडचणीत? मनसेने केली तक्रार दाखल

सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Filed a complaint against Varun Sardesai  .jpg
Filed a complaint against Varun Sardesai .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी निदर्शने करण्यात आली होती. युवासनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर मोर्चा काढला होता. यावेळी मोठ्या संख्येने युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी झालेल्या गोंधळात सरदेसाई हे पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या विरोधात तक्रार दाखळ केली आहे. (Filed a complaint against Varun Sardesai) 

मनसेचे सरचिटणीस अखील चित्रे यांनी या संदर्भात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी चित्रे म्हणाले, ऐरवी गुन्हा दाखल करण्यास तत्पर असणारी मुंबई पोलिस कोणाच्या दबावामुळे 'सरकारी भाचा' वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही, असा सवाल त्यांनी केला. 

१५-२० दिवस उलटून देखील अद्याप कारवाई नाही. हिंदू सण साजरे होत असताना थोडी देखील चुक झाली तर त्वरीत गुन्हा दाखल करणारे या भाच्यावर गुन्हा कधी दाखल करणार. असेही चित्रे म्हणाले. पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तरी कुठल्याही पद्धतीची कारवाई सरदेसाई यांच्यावर करण्यात आली नाही. म्हणून तक्रार दाखल केल्याचे चित्रे यांनी सांगितले. 

एरवी सणांमध्ये जास्त माणसे असली आणि मास्क खाली असेल तर कायवाई होते. मात्र, वरून सरदेसाई यांनी हे आंदोलन त्यावेळी हजारो कर्याकर्ते एकत्र आले होते. तरीही त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असेही चित्रे यांनी सांगितले. या आंदोलना वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना याठिकाणी सौम्य लाठीचार्ज करवा लागला होता. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली होती. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com