सुवेंदू अधिकारींनी चोरली ताडपत्री; ममता सरकारने केला गुन्हा दाखल 

पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.
सुवेंदू अधिकारींनी चोरली ताडपत्री; ममता सरकारने केला गुन्हा दाखल 
Suvendu Adhikari .jpg

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पराभूत करणाऱ्या भाजपच्या (Bjp) सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर यास चक्रीवादळातील पीडितांना देण्यासाठी आणलेले साहित्य चोरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. कोंटाई नगरपालिकेच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Filed a case against BJP's Suvendu Adhikari)

तक्रारीत म्हटले आहे की २९ मे रोजी हिमांशू मन्ना आणि प्रताप डे नावाच्या व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. या प्रकरणात सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मदत आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिंमाशू मन्न आणि प्रताप डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यातील प्रताप डे याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु केली आहे. मदत साहित्य नंदीग्राममधील यास चक्रीवादळात पीडितांना वाटण्यासाठी घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. 

शनिवारी पोलिसांनी सुवेंदू अधिकारी यांच्या साथीदाराला अटक केली आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रेखल बेरा यांना अटक केली. सुजीत डे यांच्या तक्रारीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. नोकरी लावून देतो म्हणून २०१९ पासून तरुणांची फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. जलसंधारण खात्यात नोकरी लावतो असे सांगून बेरा आणि चंचल नंदी यांनी २ लाख रुपये घेतल्याचंही सुजीत डे यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye   

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in