'पंढरपूर दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. ' - File case against the culprits in Pandharpur accident  | Politics Marathi News - Sarkarnama

'पंढरपूर दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. '

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश अजित पवार यांनी दिला आहे.

मुंबई : 'पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावेत,' असे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याचा व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी यांची गांभीर्याने दखल घेऊन मदतकार्य तातडीने सुरु करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी, पोलीस व प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी संबंधित जिल्हा व पोलिस प्रमुखांना दिल्या आहेत. अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे आदेश दिले आहेत.

पंढरपूर शहरात बुधवारी (ता.14) मुसळधार पाऊस झाला. यामध्ये चंद्रभागानदी काठच्या  कुंभार घाटाजवळ घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यु झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी चार वाजता झाली.

या दुर्घटनेमध्ये मंगेश गोपाळ अभंगराव,गोपाळ लक्ष्मण अंभराव, राधा गोपाळ अंभगराव, संग्राम उमेश जगताप यांच्यासह विदर्भाताली दोन अनोळखी महिलांचा मृत्यु झाला. घटनेनंतर  नगरपालिकेच्या पथकाने सर्व मृतदेह बाहेर काढले.

निकृष्ठ घाटबांधणीच्या कामामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक रमेश कांबळे केली आहे. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री दत्ता भरणे यांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे.  घटनेस जबाबदार धरुन बांधकाम ठेकेदार अशोक भागवत इंगोल( बीड) यांच्यासह सहा जणांवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख