भाजपच्या फटकार मोर्चाचे फटकेबाजीत रुपांतर

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
 Fighting between ShivSena and BJP workers in Mumbai .jpg
Fighting between ShivSena and BJP workers in Mumbai .jpg

मुंबई : मुंबईत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. शिवसेना (ShivSena) भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे वाद झाल्याची माहिती मिळत आहे. या टीकेविरोधात शिवसेनाला फटकारण्यासाठी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाचे रुपांतर फटकेबाजीत झाले. हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. (Fighting between ShivSena and BJP workers in Mumbai)

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेविरोधात भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन केले. शिवसेना भवनच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्या घोषणाबाजीचे रुपांतर नंतर तुफान हाणामारीत झाले.

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजप जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. 

भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते जमले होते. पण जेव्हा भाजपचे काही कार्यकर्ते विटा, दगड घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे शिवसैनिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवले असता बाचाबाची झाली. भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची योजना होती, असा आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे. 

भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आंदोनल पोलिसांना सूचना देऊन करत होते. तरीही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या आड राहून एका महिलेला मारहाण करणे म्हणजे शिवसेनेने आपली औरंगजेब वृत्ती दाखवली आहे, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हणाले आहे. लातो के भूत बातोसे नाही मानते यापुढे शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com