आचार्य अत्रेंच्या कन्या मीना देशपांडे याचं निधन  - Famous Writer Meena Deshpande passed away | Politics Marathi News - Sarkarnama

आचार्य अत्रेंच्या कन्या मीना देशपांडे याचं निधन 

वृत्तसंस्था
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मीना सुधाकर देशपांडे (वय 86) यांचे आज पहाटे कोरोनामुळे अमेरिकेत निधन झाले.

न्यूयॉर्क : आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना सुधाकर देशपांडे (वय 86) यांचे आज पहाटे कोरोनामुळे अमेरिकेत निधन झाले. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. चार दिवसांपूर्वी (2 सप्टेंबर) त्यांच्या थोरल्या भगिनी शिरीष पै यांची पुण्यतिथी होती. फेसबुकवर पोस्ट करीत ज्येष्ठ कवी, लेखक महेश केळुस्कर यांनी मीना देशपांडे यांचं निधन झाल्याचे सांगितलं.   

https://www.facebook.com/mahesh.keluskar/posts/3337536206336462

मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा

 

  1. आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
  2.  अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
  3.  पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह) 
  4. मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित चरित्र)
  5.  मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
  6.  ये तारुण्या ये (कथासंग्रह) 
  7. हुतात्मा (कादंबरी)
  8. महासंग्राम ( कादंबरी)
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख