पूजा चव्हाण प्रकरणातील "ती"ऑडिओ क्लिप बनावट..?  

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लिप क्लिप बनावट असू शकते," असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे
ac15.jpg
ac15.jpg

उदगीर (लातूर) : "पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणात जे लोक दोषी आहेत, त्यांना कडक शिक्षा होईल. पण शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ही क्लिप बनावट असू शकते," असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं बोलत होते. 

पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की माझ्या मुलीची बदनामी मीडियाने थांबवावी. तिनं आर्थिक विवेंचनेतून आत्महत्या केली, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले
. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाजही पूजाचा नसल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.

मिटकरी म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की या प्रकरणाची पूर्ण चैाकशी झाल्यानंतर सिद्ध होईल की वनमंत्र्यांचा संबध आहे की नाही, हे स्पष्ट होईल. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मी देखील राज्य सरकारच्या शक्ती कायदा समितीवर आहे. जर कोणी या गैरवापर करून एखाद्याला असे बदनाम करून करिअर उद्धस्त करीत असेल तर खपून घेतले जाणार नाही. आँडिओ क्लिप बनावट सुद्धा असू शकते. पूर्ण सत्यता बाहेर आल्याशिवाय कोणीही कुठल्याही निकषापर्यंत जाऊ नये, असे मला वाटतं.

पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीचा आठ दिवसापूर्वी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू की आत्महत्या याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. तिचा भाऊ आणि त्या भावाच्या मित्राचा जवाब नोंदविण्यात आला आहे. आज पुन्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकऱणात एक आँडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या आँडिओ क्लिपमधील संभाषणात सहभागी असलेला एक जण त्यांच्या कुंटुबासह पळून गेला आहे.  

एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आँडिओ क्लिप पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.

'पहिल्या मजल्यावरून पडलेली पूजा चव्हाण हिने मद्यपाशन केले होते, या दोघांनी दिला आहे,' अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या मृत्यूबाबत पुन्हा निराळ्या शंका सुरू झाल्या असून तिनं दारू पिली होती की तिला दारू पाजण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजाचा मृत्यू झाला असल्याचे म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com