खडसेंचे भाजप सोडण्याचे एकच कारण : फडणवीस, फडणवीस आणि...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या त्रासामुळे आणि खोटेनाटे आरोप केले. माझ्या वाट्याला बदनामी आली. माझ्यावर बोगस विनयभंगाचा खटला दाखल केला याला फडणवीस हेच जबाबदार आहेत. आता या खटल्यातून काही दिवसापूर्वी मी बाहेर पडलो आहे. जर या खटल्यात मला तीन वर्षे शिक्षा झाली असती तर माझे आयुष्य उद्धवस्त झाले असते, याकडेही खडसे यांनीलक्ष वेधले.
eknath khadse-devendra fadnavis
eknath khadse-devendra fadnavis

मुंबई : “माझा भाजपवर रोष नाही, कोणत्याही केंद्रीय नेत्यावर टीका नाही. मी फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत आहे,” असे मत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. हो, केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला भाजप सोडावा लागला. माझी पक्षावर निष्ठा होती. आयुष्यात मी कधीही भाजपविरोधात बोललो नाही असे सांगतानाच गेल्या चाळीस वर्षापासून ज्या पक्षात राहिलो. तो पक्ष सोडताना दु:ख निश्‍चितपणे होत आहे असे सांगताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काहीसे भावूक झाले होते. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या त्रासामुळे आणि खोटेनाटे आरोप केले. माझ्या वाट्याला बदनामी आली. माझ्यावर बोगस विनयभंगाचा खटला दाखल केला याला फडणवीस हेच जबाबदार आहेत. आता या खटल्यातून काही दिवसापूर्वी मी बाहेर पडलो आहे. जर या खटल्यात मला तीन वर्षे शिक्षा झाली असती तर माझे आयुष्य उद्धवस्त झाले असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

“आज मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भाजपचं काम करत होतो. या 40 वर्षात अनेक प्रसंग आले. भाजप खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भाजप उपेक्षित होती, त्यावेळपासून आजतागायत भाजप पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आलो. भाजपने देखील या कालखंडात मला मोठ्या प्रमाणात राजकारणात अनेक पदं दिले. ते मी नाकारु शकत नाही. भाजपबद्दल माझ्या मनात कोणताही रोष नाही. मी भाजपच्या कोणत्या केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही,” असे एकनाथ खडसेंनी सांगितले.

“मधल्या कालखंडात मुख्यमंत्री होण्याचं ज्यावेळेला म्हटलं, बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे त्यानंतरच्या काळात जे काही घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्या अनेक चौकश्या झाल्या, भूखंड हडप करण्याचे आरोप झाले, माझ्यावर खोट्या विनयभंगाचा खटलादेखील दाखल करण्यात आला. दमानिया यांनी त्यांचा विनयभंग केल्याचा खोटो खटला दाखल केला. पोलीस त्यावेळी तयार नव्हते. दमानिया यांनी पोलीस स्टेशनला रात्रभर गोंधळ घातला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितला. वास्तविक अशा स्वरुपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं चुकीचं आहे. या खटल्यातून मी नुकतंच 15 दिवसापूर्वी बाहेर आलो. छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या. तरीही इतके दिवस मी सहन करत आलो.”

“एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं, कोर्टामध्ये खटला चालणं, यापेक्षा मरणं आहे. खटला दाखल करण्यासाठी गोंधळ केला म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सांगणं. मी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, ती मुंबईत मी मुक्ताईनगर तेव्हा नाईलाजास्तव गुन्हा दाखल केला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. नियमानुसार, कायद्यानुसार काम करा, असं त्यावेळेस सांगता आलं असतं. मला खूप बदनामी सहन करावी लागली. तरीही त्यानंतर मी 4 वर्ष काढलं. माझ्या कथित पीएवर त्यांनी 9 महिने पाळत ठेवली. तु्म्ही आमच्यावर पाळत ठेवत होते. आयुष्यात मला काय मिळालं नाही मिळालं याचं दु:ख नाही. पण मनस्ताप झाला याचं जास्त दु:ख आहे. मी जे काही पद मिळवलं ते माझ्या ताकदीवर झालं.” असे एकनाथ खडसे म्हणाले

भाजपमधील एकटे चंद्रकांतदादा पाटील यांनी फोन केला होता. त्यांच्याशिवाय कोणीही मला फोन केला नाही आणि कोणीही चर्चा केली नाही असेही खडसे यांनी सांगितले. मी पक्ष सोडला नाही, तर पक्षाने मला बाहेर ढकलले असेही खडसे यांनी सांगितले. आज मी भाजप सोडला आहे. पण, पक्ष का सोडला ? माझा गुन्हा काय असा सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com