मेहुल चोकशीचे प्रत्यार्पण लांबणीवर..अधिकारी परत..पाच दिवसात तीन कोटींचा चुराडा.. - extradition the special plane that went to bring mehul choksi returned empty it may take a long time | Politics Marathi News - Sarkarnama

मेहुल चोकशीचे प्रत्यार्पण लांबणीवर..अधिकारी परत..पाच दिवसात तीन कोटींचा चुराडा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

प्रत्यार्पणाच्या सुनावणी आधी चोकसीवर असलेल्या दोन आरोपावर सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी, हिऱ्यांच्या व्यापारी मेहुल चोकसी यांचे प्रत्यार्पण लांबणीवर पडले आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी डोमिनिका येथे गेलेले सीबीआयचे पथक परत आले आहे. प्रत्यार्पणाच्या सुनावणी आधी चोकसीवर असलेल्या दोन आरोपावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यार्पणावर डोमिनिका न्यायालयात सुनावणी होणार आहे. extradition the special plane that went to bring mehul choksi returned empty it may take a long time

मेहुल चोकसीला परत आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. तो भारतात आल्यावर अनेक महत्वाच्या बाबी उजेडात येणार आहे. चोकसीला परत आणण्यासाठी बॉम्बार्डियर ग्लोबल जेट 5000 हे विशेष विमान गेलं होतं. त्याचं एका तासाचे भाडे ९ लाख रुपये आहे. एँटिगुआ जाण्याचा खर्च सुमारे १.३५ ते १.४३ कोटी रुपये आहे. अन्य खर्च धरुन सुमारे ३ कोटी रुपये या पाच- सहा दिवसात खर्च झाले असावेत.  

एँटिगुआ येथून पळून गेलेला मेहुल चोकसी डोमिनिका येथे गेला होता. तेथे त्याला अटक करण्यात आली. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे पथक डोमिनिका येथे ता. २८ मे रोजी गेले होत. यात सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. पण त्यांना रिकामा हाती भारतात परत यावे लागले आहे.  मेहुल चोकसी पोलिसांनी केलेली अटक बेकायदा होती का..त्यांचा डोमिनिकामध्ये बेकायदा प्रवेश या दोन प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या प्रत्यार्पणावर सुनावणी होणार आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. 
 
आपल्या जीवाला धोका असल्याचे त्याने डोमिनिकाच्या न्यायालयात नुकतेच सांगितले. मेहुल चोकसीने न्यायालयात सांगितले, "डोमिनिका येथील पोलिस कोठडीत मी सुरक्षित नसून ऍटिगुआ येथे परत जाण्यासाठी जो खर्च येईल तो देण्यास मी तयार आहे." त्याला बेकायदा डोमिनिकामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले होते.  मेहुल यांची याचिका सुनावणीसाठी लायक नसल्याचे डोमिनिका सरकारने न्यायालयात सांगितले. त्याला भारताकडे सोपवावे, असे डोमिनिका प्रशासनाने सांगितले आहे.  

मेहुल चोकसीची पत्नी प्रीति चोकसीने सांगितले की, मेहुलच्या जिवाला धोका आहे. प्रीतिने डोमिनिकाच्या सुमद्रकिनाऱ्यावर मेहुलसोबत दिलेल्या त्याच्या कथित गर्लफ्रेण्डसंदर्भातही महत्वाचा खुलासा केलाय. मेहुलला अटक करण्यात आली त्या दिवशी काय घडलं यासंदर्भातही प्रीतिने सविस्तरपणे भाष्य केलंय.   प्रीतिला मुलाखतीदरम्यान मेहुल यांच्यासोबत नाव जोडलं जाणाऱ्या मुलीसंदर्भात म्हणजेच बारबरा जैबरिकासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना, “मला माहितीय की मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ती अँटिग्वा आली होती. तेथील बेटांवरील आमच्या दुसऱ्या घरीही ती येऊन गेली होती. तेथील स्वयंपाक्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती,” असं प्रीतिने सांगितलं. 

सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कारागृहात असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी या बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.  
  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख