दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या पण पंचायत निवडणुकीत हरल्या - Ex Mp reena chaudhary defeat in up panchayat election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या पण पंचायत निवडणुकीत हरल्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

निकालांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील त्रिस्तरीय पंचायत (UP Panchayat Election) निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या या निवडणुकांची मतमोजणी (UP Election Result) रविवारपासून सुरू आहे. आज रात्रीपर्यंत जवळपास सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. पण निकालांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. भाजपला अयोथ्या (Ayodhya), मथुरा, काशी, गोरखपुर आदी जिल्हांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.

भाजपकडून मोहनलालगंजच्या माजी खासदार रीना चौधरी याही निवडणूक रिंगणात होत्या. पण त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत दोन हजारांहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला आहे. त्या दोन वेळा खासदार म्हणून निवडूण आल्या होत्या. निवडून आल्यास त्यांना जिल्हा पंचायतचे अध्यक्षपद दिले जाणार होते. पण त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. 

हेही वाचा : रोहित पवारांना जी भिती होती, ती अखेर खरी ठरली!

चौधरी यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवार पलक रावत यांनी पराबूत केले. चौधरी या पूर्वी समाजवादी पक्षामध्ये होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रावत यांना सुमारे साडे आठ हजार मतं मिळाली. तर चौधीर यांना 6 हजार 735 मतांवर समाधान मानावे लागले. लखनऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला एससी गटासाठी आरक्षित आहे. याठिकाणी भाजपकडून चौधरी यांनी उमेदवारी देण्यात आली होती.  

शेतकरी आंदोलनाचा फटका

उत्तर प्रदेशमधील पंचायत निवडणुकीत भाजपला शेतकरी आंदोलनाचा फटका बसल्याचे दिसत आहे. बागपत, मथुरा या भागात भाजपचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. या भागात अजित सिंह यांच्या आरएलडीच्या उमेदवारांना पसंती मिळाली आहे. तसेच लखनऊ, वाराणसी, गोरखपुर, काशी, अयोध्या या जिल्ह्यांमध्येही भाजपला चमक दाखविता आलेला नाही.

मिनी विधानसभेत धक्का

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. त्यामुळे पंचायत निवडणुकांकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात आहेत. पण या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. शेतकरी आंदोलनासह कोरोना संकटामध्ये लोकांचे झालेले हालही या निकालांना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. अद्याप निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले नसले तरी सुरूवातीचे कल भाजपची चिंता वाढवणारे आहेत.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख