माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन

जळगाव शहरात कोरोनाच्या साथीची गंभीर स्थिती आहे. त्यात एका नेत्याचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
haribhau jawale
haribhau jawale

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ माधव जावळे (वय 67) यांचे कोरोनामुळे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
हरिभाऊ जावळे यांना दहा दिवसापूर्वी ताप व खोकल्याचा त्रास होवू लागल्याने त्यांची "कोरोना'तपासणी करण्यात आली. ती पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना आज दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले.

जळगाव शहरात कोरोनाच्या साथीची गंभीर स्थिती आहे. त्यात एका नेत्याचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.  जावळे हे भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. रावेर लोकसभा मतदारसंघातून ते भारतीय जनता पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सन 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीत ते रावेर विधानसभा मतदार संघातून निवडून आले. या आगोदरही ते यावल विधानसभा मतदार संघातून आमदार होते. नुकत्याच झालेल्या 2018 च्या विधानसभा निवडणूकीत ते रावेर विधानसभा मतदार संघातून पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती.

सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. न्हावी (ता.फैजरपूर )येथील मधुकर सहकारी साखर कारन्याचे ते माजी चेअरमन होते. कृषी क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास होता. जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला चांगला भाव मिळावा यासाठी ते सतत प्रयत्नशिल होते. ताप्ती व्हॅली बनाना केंद्राचे ते संस्थापक अध्यक्ष होते. कृषी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. 

ही बातमी पण वाचा  : दिल्लीचे आरोग्यमंत्री यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. दिल्लीतही वातावरण चिंताजनक आहे. त्यातच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याने आणखी घबराट उडाली. पण सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला.

जैन यांना ताप येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे आढळल्यानंतर काल रात्री राजीव गांधी रूग्णालयात रूग्णवाहिकेतून तातडीने दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आल्यानंतर हा अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. जैन यांना कालपासून जास्त ताप आला व नंतर नंतर श्‍वास घेण्यासही त्रास होऊ लागला. त्यानंतरही ते शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले होते. अखेर काल रात्री त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करुन त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. जैन यांनी आज सकाळी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली. त्यांना सातत्याने कृत्रिम ऑक्‍सीजनचा पुरवठा करण्यात येत होता. दिल्लीत कोरोना लढाईची सूत्रे केंद्राने हाती घेतली असली तरी राज्य सरकारच्या बाजूने जैन यांच्याकडेच महत्वाची सूत्रे असल्याने ते कोरोनाग्रस्त निघाले असते तर दिल्ली सरकारची काळजी वाढली असती. 

जैन गेले काही दिवस कोरोना निर्मूलनाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये सातत्याने सहभागी होत होते. नायब राज्यपाल अनिल बैजल, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया हे देखिल या बैठकांना उपस्थित असायचे.  जैन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारने आज होणाऱ्या महत्वाच्या बैठका रद्द केल्या आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे आणखी १०,६६७ नवे रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. जूनमध्ये दररोज इतक्‍या मोठ्या संख्येने रूग्ण येत आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची 'अधिकृत' संख्या आता ३ लाख ३४ हजार ०९१ एवढी झाली आहे. मृतांचा आकडाही १० हजारांच्या आसपास गेला आहे. तरीही दिलासा देणारी बाब म्हणजे देशात आजही तुलनेने मृत्यूदर कमी आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com