विजय शिवतारे रुग्णशय्येवर; साठ कोटींची संपत्ती आणि त्यावरून कुटुंबात जाहीर वाद! - Ex minister Vijay Shivtare on bed but son and daughter fight for property | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

विजय शिवतारे रुग्णशय्येवर; साठ कोटींची संपत्ती आणि त्यावरून कुटुंबात जाहीर वाद!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 22 जून 2021

विजय शिवतारे यांचा हा कौटुंबिक वाद आर्थिक मुद्यावरून असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. 

पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कौटुंबिक वाद आज त्यांची कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी फेसबूक पोस्टव्दारे मांडला आहे. त्यानंतर काही वेळातच शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी ममता लांडे-शिवतारे यांचे आरोप खोडून काढले. सोशल मीडियावर या दोन्ही पोस्टवर चर्चा सुरु आहे. शिवतारेंचा कौटुंबिक वाद  (Shivtare family dispute) नेमका काय आहे, हे जाणून घेऊ या.

शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी. त्यांच्यापासून विनय, विनल आणि ममता अशी तीन मुले आहेत.  ममता या दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपमहानिरीक्षक आणि प्रसिद्ध पोलिस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. मूळचे अकोल येथील असलेले लांडे हे बिहार केडरचे अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. ममता आणि लांडे यांचा भव्य विवाहसोहळा सासवडमध्ये झाला होता. मंदाकिनी या डाॅक्टर आहेत. त्या थेटपणे वादात कधी उतरल्या नव्हत्या. मात्र त्यांनी शिवतारे यांचा ब्रीच कॅंडी रुग्णालयातील आयसीयूमधील फोटो सोशल मिडियावर टाकत एक सविस्तर पोस्ट लिहिली. त्यातून हा वाद पुढे आला. या आधी मुलगा विनय हा वडिलांच्या विरोधात एक-दोन ओळीत पोस्ट फेसबुरवर लिहित होता. मात्र हे अकौंट अधिकृत आहे की फेक यावरून त्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. मात्र ममता यांच्या पोस्टनंतर त्यातील गांभीर्य लक्षात आले. विनय याला राजकारणात यायचे होते. मात्र त्यास शिवतारे यांचा विरोध होता, अशीही चर्चा आहे. गेली चार-पाच वर्षे तो पुरंदरमध्ये फारसे लक्ष देत नव्हता. 

 

उद्योजक  ते जलसंपदामंत्री
शिवतारे हे मुळचे पुंरदरजवळील यादववाडी येथील. पुढे व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले. तेथे त्यांनी कोळंबीच्या आयात-निर्यातीतून आपला व्यवसाय भरभराटीस आणला. यातून त्यांना आर्थिक बळ मिळाले.  शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबध होते. शिवसेनेकडून मुंबई महापालिकेची निवडणुकही त्यांनी लढवली होती. पण त्याच त्यांना अपयश आले. २००४च्या जवळपास ते पुरंदरमध्ये आले. ते राजकारणात सक्रीय झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळेल,अशी आशा होती, पण अशोक टेकवडे यांना तिकीट मिळाले. त्यानंतर शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले. त्यातून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचले. २००९ मध्ये आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल,असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंची जंगी सभा त्यांनी सासवडमध्ये घेतली. या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडल्यामुळे त्यांची राज्यात एक ओळख निर्माण झाली. त्यांच्या आक्रमण बोलण्याची दखल अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतली. ते जलसंपदा मंत्री झाले.  यातून शिवसेनाला चांगला नेता मिळाला. ते साताऱ्याचे पालकमंत्रीही होते. त्यांनी गुंजवणीच्या पाण्यासाठी आंदोलन केले. त्याचा फायदा त्यांना २०१४च्या निवडणूकीत झाला. पण २०१९ च्या निवडणुकीत आपला सहज विजय होईल, पण तसे झाले नाही. पराभवानंतर त्यांच्या आजारपणामुळे ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले.

संपत्ती ६० कोटी..

शिवतारे गरिबीतून पुढे आले आहे. त्यांनी 2019 मध्ये दाखल निवडणूक प्रतिज्ञापत्रात ६० कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे. पत्नीच्या नावावरही काही मालमत्ता या प्रतिज्ञापत्रात दिसते. स्वामी समर्थ शुगर अॅग्रो या कंपनीचे सुमारे साडेचार कोटी रुपयांचे शेअर शिवतारे यांच्या नावावर आहेत. तर पत्नीच्या नावावर सुमारे एक लाख रुपयांचे शेअर आहेत. हीच कंपनी सध्या वादाचा मुद्दा बनली आहे. रोखे, सोने, दागिने, बॅंकेतील ठेवींपैकी शिवतारेंच्या नावावर सुमारे पावणे सात कोटी तर पत्नीच्या नावावर 85 लाख रुपये प्रतिज्ञापत्रात दाखविण्यात आले होते. जागा, फ्लॅट ही  या अचल मालमत्तेपैकी सुमारे 44 कोटी रुपये शिवतारेंच्या नावावर आणि पावणे सात कोटी पत्नीच्या नावावर आहेत. 

 

आपल्या फेसबुकपोस्टमध्ये ममता लांडे- शिवतारे म्हणतात..

शिवतारे यांच्या कन्या ममता शिवदीप लांडे-शिवतारे यांचा सारा रोख त्यांचे बंधू विनय आणि विनस यांच्यावर आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सारी संपत्ती या दोन भावांच्या नावांवर करूनही त्यांचे समाधान झालेले नाही. एवढेच नाहीतर माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मागील काही दिवसांत विनय शिवतारे हे फेसबुकवरून वडिलांबद्दल अनेक पोस्ट टाकत होते. ते वडिलांना बदनाम करत असल्याचे ममता यांनी म्हटले आहे. वडिलांच्या जिवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागिल दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र, मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे, असा आरोप त्यांनी केला.

पती मंदाकिनी शिवतारेंचा गंभीर आरोप

ममता यांच्या पोस्टनंतर विनय यांनी उत्तर दिले नाही. त्याऐवजी आई मंदाकिनी शिवतारे यांनी उत्तर दिले. त्यांनी पती शिवतारे यांच्यावर वेगळेच आरोप केले. 

मंदाकिनी शिवतारे म्हणतात, "माझी मुलगी ममता शिवदीप लांडे- शिवतारे यांनी केलेली पोस्ट वाचली. तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्याविरोधात केलेले आरोप खोटे आहेत. वास्तविक पाहता गेल्या २७ वर्षापासून माझे पती विजय शिवतारे हे कुंटुबियांपासून अलिप्त राहत आहेत. त्यातील पहिली पाच वर्ष ते उज्ज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करुन राहत होते. त्यांच्यानंतरची आजतागायत ते मिनाश्री पटेल हिच्यासोबत पवई येथे वास्तव्यास आहेत. याबाबतीत संपत्ती या वादाचा विषय नसून विजय शिवतारे यांच्याव्दारे सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबविणे व स्वतःला त्या जाचातून मुक्तता करुन घेणे हा एकमेव हेतू आहे."

मंदाकिनी शिवतारे या जरी आपण पत्नीपासून 27 वर्षे वेगळे राहत असल्याचा दावा करत असल्या तरी त्यांना सासवडमध्ये अनेकांनी विविध कार्यक्रमांत शिवतारेंसोबत या आधी पाहिले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख