माजी आयपीएस ''सिंघम'' भाजपचे सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष

अन्नामलाई कुप्पूस्वामी यांचा राजकीय प्रवास फक्त अकरा महिन्याचा आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-12T154653.435.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-12T154653.435.jpg

नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी IPS के. अन्नामलाई यांची तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाली आहे. कर्नाटक कँडरचे IPSअधिकारी अन्नामलाई यांनी गेल्या वर्षी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. सिंघम म्हणून ओळख असलेले ३६ वर्षीय अन्नामलाई हे भाजपचे सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात एल. मुरुगन यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्षाच्या रिक्त जागेवर युवा चेहऱ्याची निवड होणार हे निश्चित होते. अन्नामलाई यांची यापदी निवड करण्यात आली आहे. अन्नामलाई (वय३६) हे भाजपचे सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष आहेत. 

अन्नामलाई प्रशासकीय सेवेतून राजकारणात

अन्नामलाई यांनी कोईम्बंतुर येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी एमबीए केलं आहे. त्यानंतर त्यांनी स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.  त्यांनी २९ मे २०१९ रोजी राजीनामा दिला. त्यांनी २५ आँगस्ट २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तामिळनाडू येथील करुर जिल्ह्यात एका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुंटुबात त्यांचा जन्म झाला असून ते  कोंगु-वेल्लार समाजातील आहे. १९७५ नंतर या जातीचा समावेश अनुसूचित जातीत करण्यात आला आहे. 

तीन दिवसापूर्वी तामिळनाडू भाजपच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या अन्नामलाई कुप्पूस्वामी यांचा राजकीय प्रवास फक्त अकरा महिन्याचा आहे. त्यांच्यावर ३६ व्या वर्षी तामिळनाडू भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मोदी सरकारने दिली आहे. भाजपमधील ''एक व्यक्ती एक पद'' या धोरणानुसार तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष एल मुरुगन हे केंद्रात मंत्री झाल्याने त्यांच्या जागी पुन्हा एकदा दलित समाजातील अन्नामलाई यांची निवड झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अन्नामलाई यांनी अरवाकुरुच्ची विधानसभेची निवडणूक लढविली होती. पण यात त्यांचा २४ हजार ३०० मतांनी पराभव झाला होता.  

''सिंघम'' नामकरणाची कहाणी...
तामिळनाडुमध्ये हेल्मेट सक्ती नसतानाही १ आँक्टोबर २०१५ मध्ये अन्नामलाई यांच्या नेतृत्वाखाली मंगलूरु येथे दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सर्व विद्यार्थ्यींनी हेल्मेट परिधान केले होते. हेल्मेटबाबत युवा वर्गात जनजागृती वाढविण्यासाठी या रँलीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अन्नामलाई हे येथील पोलिस अधिक्षक SP होते. महिला सुरक्षा, धुम्रपानाला विरोध, वाहतूक नियमाबाबत जनजागृती सुरक्षा अँप आदी विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. ''सेवेसाठी नेहमीच तत्पर'' म्हणून ओळख असलेल्या अन्नामलाई हे ''सिंघम'' म्हणून ओळखले जातात. ते नोकरीत असताना त्यांची बदली झाल्यानंतर उड्डपी येथे पोलिस मुख्यालयासमोर त्यांची बदली रद्द करण्याची नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन, मोर्चा काढला होता. एका अल्पवयीन मुलींवर बलाकार करुन हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्या मुलींच्या नावे अन्नामलाई यांनी दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या मुलींला त्या पीडीत मुलीच्या नावाने शिष्यवृत्तीची सुरवात केली आहे. ही शिष्यवृत्ती पाच वर्षापासून सुरू आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com