"मुलाययमसिंह, मायावती, अखिलेश सत्तेवर असतानाही दलितांवर अत्याचार होतच होते !'  - Even when Mulayam Singh, Mayawati, Akhilesh were in power, atrocities were being perpetrated on Dalits!" | Politics Marathi News - Sarkarnama

"मुलाययमसिंह, मायावती, अखिलेश सत्तेवर असतानाही दलितांवर अत्याचार होतच होते !' 

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

हाथरस प्रकरण चांगलेच तापल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : दलितांवर अत्याचार होत आहेत हे खरं आहे. परंतू मुलायमसिंह यादव, मायावती आणि अखिलेश यादव यांचे यूपीत सरकार असताना दलितांवर अत्याचार होत होते असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

हाथरस जिल्ह्यात एका दलित युवतीची बलात्कार करून झालेल्या हत्येने संपूर्ण देश हादरला. यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर गेल्या पाच दिवसापासून चौबाजूने टीका होत आहे. त्यातच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना तेथे गेल्या गुरूवारी जावू दिले नाही. पोलिसांनी दादागिरी करीत राहुल यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर ते काल पुन्हा तेथे गेले. सरकारने पाचजणांना सोडण्याची परवानगी दिली होती. अखेर ते पिडित मुलीच्या नातेवाईकांना भेटून आले. 

हाथरस प्रकरण चांगलेच तापल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली आहे. यावरूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. यापूवी योगी यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांसह काही पोलिसांनाही निलंबित केले आहे. यूपीतील कायदा सुव्यवस्था आणि दलितांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनावरून योगी सरकारला लक्ष्य केले जात असताना आठवले यांनी असे अत्याचार मुलायमसिंह, मायावती आणि अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळातही होत होते असे म्हटले आहे. "एएनआय'ने तसे वृत्त दिले आहे. 

दलित अत्याचारप्रकरणी रामदास आठवले यांनी म्हटले आहे, की दलितांवर अत्याचार होत आहेत हे खरं आहे. परंतू मुलायमसिंह यादव, मायावती आणि अखिलेश यादव यांचे यूपीत सरकार असताना दलितांवर अत्याचार होत होते.दलित अत्याचाराचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जातीयवाद आहे. जोपर्यंत लोकांच्या मनातून जातीयवाद जात नाही तोपर्यंत दलितावर अत्याचार होतील. 

दरम्यान, भाजपचा एकेकाळचा परममित्र असलेल्या शिवसेनेनेही योगी सरकारवर आपल्या स्टाइलने हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. मुंबईत शिवसेनेते हाथरसप्रकरणी योगी सरकारचा निषेध करीत आंदोलन केले होते. देशातील सर्वच पक्षांनी आणि संघटनांनी हाथरसप्रकरणावरून योगी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. 

हे ही वाचा : 

गोरगरीब, दलित, आदिवासींसाठी आपले सरकार काम करतंय, नरेंद्र मोदींचा दावा 

मनाली (हिमाचल प्रदेश) : " आपले सरकार गोरगरीब, दलित, आदिवासी आणि वंचित समाजासाठी काम करीत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गेल्या साठ वर्षात ज्या अठरा हजार गावात वीज नव्हती त्या गावात आता प्रकाश पडला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदी म्हणाले, की केंद्रात आपले सरकार आल्यापासून देशाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील आदिवासी, गरीब, दलित, विंचत समाजासाठी काम करीत आहे. स्वातंत्र्याला सात दशकं उलटल्यानंतरही देशातील 18 हजार गावात साधी वीजही पोचली नव्हती. पण, अशा गावात आपल्या सरकारने वीज नेली आहे. त्या गावांना विजपुरवठा करण्यात आला आहे. तसेच गावात शौलालये, स्वंयपाकासाठी गॅस कनेक्‍शनही देण्यात आले आहे, गरीबांवर चांगले उपचार व्हावे म्हणून पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्यासाठी सेवा देण्यात येत आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख