मुंबई : राज्यातील वीज कर्मचार्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. तसेच ते यावर्षीही मिळणार आहेत.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे. आदेशाची अमंलबजावणी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता हे करणार आहेत.
वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा तत्वतः निर्णय मी घेतला असून रकमेची घोषणा येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये करण्यात येईल. सर्व संघटनांनी आपला संप रद्द करून वीज ग्राहकांना त्रास होईल,असे कृत्य करू नये असे आवाहन मी करीत आहे! @CMOMaharashtra@INCMaharashtra
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) November 13, 2020
लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, बोनससह अन्य मागण्यांसाठी विविध वीज कर्मचारी संघटांना अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. यातील बोनसची मागणी मान्य करण्यात आल्यामुळे वीज कर्मचार्यांचा संप होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी महावितरणने सरळ 327 तर अंतर्गत भरतीद्वारे 41 कनिष्ठ अभियंत्यांची निवड केली होती. कोरोनामुळे या सर्व पात्र उमेदवारांना कागद पडताळणी होऊनही नियुक्ती आदेशाकरता वाट पहावी लागली. त्यातच महावितरणच्या बिल वसुलीवर कोरोनाचा मोठा प्रभाव पडल्याने कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली होती.
वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची माहितीही नितीन राऊत यांनी ट्विट करत दिली. लॉकडाऊन काळात वीजपुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज वितरण यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका वठवली. हे लक्षात ठेवून ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
साहजिकच या सर्वाचा प्रभाव नवीन नियुक्तीवर झाला होता. मात्र, आता ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नियुक्ती आदेश देण्याच्या सूचना दिल्या असल्याने या सर्व कनिष्ठ अभियंत्यांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूणच या सर्व अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे.

