ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार ; मदिरा बाजूला ठेऊन मंदिरं उघडा! 

भाजपचे आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
1Sarkarnama_20Banner_20_202021_08_03T121458.924.jpg
1Sarkarnama_20Banner_20_202021_08_03T121458.924.jpg

पुणे : मंत्रालयातच  Mantralaya काल दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडल्याने मंत्रालयातील एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी ही घटना असल्याची टीका करीत १५ दिवसांत याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. भाजपचे आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले Tushar Bhosale यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

तुषार भोसले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, ''मंत्रालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या आणि मंत्रालयाच्या फाईलींमधे दारूला धार्जिण असलेली धोरणं आहेत. या सरकारने मंत्रालयाचं रुपांतर मदिरालयात केल्यामुळे देवालये कशी उघडणार ? ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार.'' 

कंबरडे मोडलेल्या उद्योगांना सावरा ; राणेंसमोर उद्योजकांनी मांडल्या व्यथा
''साधु-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे नाव काळ्या अक्षरात लिहीले जाईल. आज होत असलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक श्रावण महिन्यातील पहिली बैठक आहे, या सरकारकडे आमची मागणी आहे, की किमान आजच्या बैठकीत तरी मदिरेचा विषय बाजूला ठेऊन मंदिरं उघडण्याचा निर्णय घ्यावा,'' असे तुषार भोसले म्हणाले. 


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून १५ दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.  

राज्याच्या प्रशासनाचा गाडा या इमारतीतून हाकला जातो. या इमारतीत जायचे असल्यास सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. असे असताना याच इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच काल आढळला. मंत्रालयातील उपहारगृह परिसरात या दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने प्रशासन चक्रावून गेले आहेत. या बाटल्या इथवर कशा पोहचल्या? उपहारगृह परिसरात दारूची पार्टी झाली का?, यामागे नेमकं कोण आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.  

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com