बारामती : येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी बारामती नगरपालिकेच्या इमारतीवर चढून आज आंदोलन सुरु केले. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
काल नगरपालिकेच्या वतीने या कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी कोणीही न गेल्यामुळे हा प्रश्न आज अधिकच चिघळला. किमान कर्मचाऱ्यांची नगरपालिकेच्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी येऊन भेट घ्यावी, अशी या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी होती, असे असताना कोणीही त्यांना भेटायला देखील न गेल्यामुळे आज नगर पालिका कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.
तुमच्या व्यवसायवृद्धीसाठी सकाळ घेऊन आलाय नवा डिजिटल प्लॅटफाॅर्म
सविस्तर वाचा: https://t.co/8KJ3UdDjza#DigitalTransformation #DigitalIndia #SakalMedia #viralpost #sakal #business pic.twitter.com/s42djbbnzD
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 12, 2020
सानुग्रह अनुदान मिळालेच पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान या संदर्भात या कर्मचाऱ्यांची चर्चा करण्यासाठी काही प्रमुख नगरसेवकही गेले होते, मात्र अकरा वाजेपर्यंत या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. कर्मचाऱ्यांनी अनुदान देण्याच्या संदर्भात अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. त्या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
नागरिकांना वेठीस न धरता हा हे आंदोलन होईल, अशा पद्धतीची भूमिका नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, अद्यापही या संदर्भात तोडगा निघालेला नाही. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी सानुग्रह अनुदान दिलेले असताना बारामती नगरपालिका हे अनुदान का देत नाही, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी केलेले काम विचारात घेता सहानुभूतीने निर्णय घ्यावा, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.
हेही वाचा : भाजप-शिवसेनेचं टि्वटवार रंगले..शिवसेना नव्हे 'शवसेना' ..अमृतांचा उल्लेख "मृता"
पुणे : बिहार निवडणुकीत शिवसेनेला आलेल्या अपयशाबाबत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिचवले होते. शिवसेनाचा उल्लेख 'शवसेना' करून अमृता यांनी टि्वट करून शिवसेनेवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये अमृता म्हणतात की
का हय ये - शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद. अमृता फडणवीस यांच्या या टि्वटला आता डॅा. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोऱ्हे यांनी टि्वट करून फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे. गोल्हे टि्वटमध्ये म्हणतात, "एका शब्दाचे महत्व असते.
#अमृताशब्दातील 'अ' चे भान महत्वाचे अमृताताई. या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील "अ" मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मन स्वास्थ चांगले राहते, आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनी च्या वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका; आपल्या नावात "अ" च महत्व आहे ते निघाले तर "मृता" राहिल , शिवसेनेची काळजी करू नका, आपले मानसिक स्वास्थ जपा, "अ" मंगल विचार मनात आणणे "अ" योग्य बरे का !!ही दिपावली आपल्या ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो..."

