मोठी बातमी : राज्यसभेच्या सहा जागांचा बिगुल; सातव यांच्या जागी कोण? 

सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
 Rajiv Satav .jpg
Rajiv Satav .jpg

नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक आयोगाकडून निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यभसेच्या सहा जागा सध्या रिक्त आहेत. त्या जागासाठी ही निवडणुक होणार आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरही निवडणुक होणार आहे. सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. (Election for six Rajya Sabha seats announced) 

त्याच बरोबर थावरचंद गहलोत (मध्य प्रदेश), मानस भूनिया, (पश्चिम बंगाल), विश्वजीत दायमरी (आसाम), थिरू मनुस्वामी (तमिळनाडू), थिरू वैथिलिंगम (तमिळनाडू), यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यसभेच्या जागा रिक्त आहेत. त्याही जागांवर निवडणुक जाहीर झाली आहे.

निवडणुक आयोगाकडून १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी केली जाणार आहे. २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. तर २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे. ४ ॲाक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

दरम्यान, राजीव सातव यांच्या निधानानंतर त्यांच्या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना त्यांच्या जागेवर संधी मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राजीव सातव यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com