रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण  - Eknathrao Khadse's daughter Rohini Khadse contracted corona   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्या आहेत. याबाबत त्यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे.

माजी मत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्या अॅड. रोहीणी खडसे यांनी गेल्याच आठवड्यात मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.या प्रवेशानंतर खडसे यांची जिलह्यात राजकीय बैंठकासाठी उपस्थिती होती., मात्र त्यांनी आपली तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. 

अॅड. रोहिणी खहसे यांनी याबाबत टि्वटव्दारे माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे कि माझी कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. मात्र सावधानता म्हणून मी रूग्णालयात दाखल होत आहे.

हेही वाचा : शिवसेनेने आमचा घात केला, पण काळ आगामी वेळ ठरवेल -  महाजन
 
जळगाव : शिवसेनेने आमचा घात करून ते सत्तेत जावून बसले आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या आहेत आम्ही विरोधी पक्षाचे काम करीत आहोत, परंतु सत्ताधारी पक्षच घाबरलेल्या अवस्थेत असून भाजप सरकार पाडणार असल्याची आवई अधूनमधून तेच उठवित असतात. आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, तिघांचे पायात पाय अडकून तेच पडणार आहेत. असा सणसणीत टोलाभाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्यात सरकार पाडण्याचा कोणताही फार्मुला चालणर नाही असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले, ''आम्ही राज्यातील सरकार पाडणार असे कधीही म्हणालो नाही. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी सोबत विधानसभा निवडणूक लढविली जनतेने युतीला सत्तेचा कौल दिला होता. मात्र जनतेचा विश्‍वासघात करून आणि मित्र पक्ष भाजपचा घात करून शिवसेनेने सत्ता स्थापन केली. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि ती भूमिका आम्ही स्विकारली आहे. जनतेसाठी आम्ही आवाज उठवित आहोत,''

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख