राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आठवडाभरापासून रुग्णालयात 

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
 Eknath Khadse .jpg
Eknath Khadse .jpg

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आठवडाभरापासून रुग्णालयात आहेत. मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. (NCP leader Eknath Khadse has been in hospital for a week) 

एकनाथराव खडसे याना कमरेचा व गुडघे दुखीचा त्रास असल्याने ते उपचारासाठी आठवड्यापूर्वी बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल झाले होते, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अड. रवींद्र पाटील यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. उद्या मुंबईत आपण त्यांची भेट घेणार आहोत.  

दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. खडसे यांच्यावरील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

खडसे यांनी मात्र जमीन घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मुळ जमीनमालकच या जमिनीचा मालक आहे. त्याने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतलेला नाही. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया रद्द झाल्याने कुणीही जमी विकत घेऊ शकतो. हे कायदेशीरच आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली होती. आपल्यामागे ईडी लावल्यास सीडी लावेन, अशा इशारा त्यांनी दिला होता. खडसे यांच्या या वक्तव्याची त्यावेळी बरीच राजकीय चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com