फारूख अब्दुल्लांची ईडीकडून तब्बल सात तास चौकशी !  - ED interrogates Farooq Abdullah for seven hours! | Politics Marathi News - Sarkarnama

फारूख अब्दुल्लांची ईडीकडून तब्बल सात तास चौकशी ! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

अब्दुल्ला यांनी काही दिवसापूर्वी 370 कलमाबाबतही धक्कादायक विधान केले होते.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांची तब्बल सात तास चौकशी ईडीने केली आहे. 

अब्दुल्ला यांनी काही दिवसापूर्वी 370 कलमाबाबतही धक्कादायक विधान केले होते. चीनच्या मदतीने हे कलम रद्द करण्यात येईल असे सांगत देश सोडण्याचीही भाषा त्यांनी केली होती. त्यांच्या देश सोडण्याच्या विधानाचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता आणि देशाने आपणास आणखी काय द्यायचे बाकी ठेवले आहे असा संतप्त सवालही त्यांना करण्यात आला होता. 

जम्मू आणि काश्‍मिरात 370 कलम रद्द केल्यानंतर त्या राज्यातील काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामध्ये अब्दुल्ला यांचाही समावेश होता. आता महत्त्वाच्या नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. अब्दुल्ला हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांचा एक घोटाळाही पुढे आला आहे.

जम्मू-काश्‍मिर क्रिकेट असोशियशनमध्ये झालेल्या 43 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्याकडे बोट दाखविले जात आहे. याच प्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरू आहे. अब्दुल्ला यांची जवळजवळ सात तास चौकशी करण्यात आली आहे. 

काल सांयकाळी ही चौकशी संपल्यानंतर अब्दुल्ला यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, की मै परेशान नही हूँ ! आप क्‍यों परेशान है ! असा सवाल त्यांनी पत्रकारांनाही केला. एकाच गोष्टीचे वाईट वाटले की चौकशी दरम्यान मी लंच घेऊ शकलो नाही. 

यावेळी अब्दुल्ला म्हणाले, की पत्रकार मित्रानो, आपणास जे प्रश्‍न विचारायचे आहे ते विचारले आहे. मला कसलीही चिंता वाटत नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे काम केले आहे आणि सांगण्यासारखे काही नाही. अब्दुल्ला असतील नसतील पण, आमचा संघर्ष कधीच संपणार नाही तो सुरूच राहणार आहे. 
दरम्यान, माझ्यावर राजकीयद्वेषापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोपही अब्दुल्ला यांनी केला होता. 

हे ही वाचा: 
तेजस्वी यादव यांची राजकीय खेळी

पाटणा : बिहार निवडणुकीचा प्रचार हळूहळू जोर धरु लागला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांची ही राजकीय खेळी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.  

‘‘नितिश कुमार यांनी चिराग पासवान यांच्याबरोबर जे केले ते चांगले नाही. चिराग यांना त्यांच्या वडिलांची कधी नव्हे ते आत्ता गरज आहे. पण रामविलास पासवान आता आपल्यात नाहीत आणि याचे आम्हाला दुःख आहे. नितीश कुमार यांची वर्तणूक चिराग यांच्यावर अन्यायकारक होती,’’ असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख