मोठी बातमी : एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; ५ कोटींची मालमत्ता जप्त

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीने गेल्या महिन्यात तब्बल 9 तास चौकशी केली होती.
 Eknath Khadse .jpg
Eknath Khadse .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचलनालय मोठा (ED) धक्का दिला आहे. ईडीने खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे. खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा यामध्ये समावेश आहे. (ED action against Eknath Khadse)  

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीने गेल्या महिन्यात तब्बल 9 तास चौकशी केली होती. भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली होती. चौधरी यांच्या अटकेनंतर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मंदाकिनी खडसे यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी एका निवेदनाद्वारे 14 दिवसांची वेळ मागितली होती. 

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली. ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून माहिती मागवली होती. भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यांची कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ही माहिती मागविण्यात आल्याने सहकार क्षेत्रात आणि खडसे समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com