लेफ्टनंट जनरल डॅा. माधुरी कानिटकर यांनी कंगनाचे उपटले कान... - Dr. Kangana Criticism of Madhuri Kanitkar | Politics Marathi News - Sarkarnama

लेफ्टनंट जनरल डॅा. माधुरी कानिटकर यांनी कंगनाचे उपटले कान...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

“आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी” असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी टि्वट केलं आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यातील वादावर राज्यातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॅा. माधुरी कानिटकर यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. कंगना राणावत हिचा निषेध करून डॅा. माधुरी कानिटकर यांनी कंगनाचे कान उपटले आहे. 'सॅाफ्ट पोर्न' म्हणून उर्मिलाची ओळख आहे, असं कंगनानं उर्मिला मातोंडकरविषयी म्हटलं आहे. 

याबाबतचं टि्वट करीत डॅा. माधुऱी कानिटकर यांनी उर्मिला मातोंडकरचे कौतुक केलं आहे. “आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी” असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी टि्वट केलं आहे. तर कंगनाविषयी त्यांनी म्हटलं आहे की मी कधीही कुणावर सहसा भाष्य करीत नाही, पण एक महिला म्हणून हे मला खूप त्रास देणारे आहे. लाजीरवाणे आहे कंगना रानावत. 

उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते ? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना ? असा प्रश्न अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाची जीभ घसरली आहे. काही दिवसापूर्वी ऊर्मिलाने कंगनावर टिका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने उर्मिलाबाबत अशी हीन भाषा वापरली आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर झालेली कारवाई ही चुकीची आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण कंगनाला पुरविण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा ही जनतेच्या पैशातून आहे. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी कंगना त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टिका उर्मिलाने कंगनावर केली होती. 
 
या पार्श्वभूमीवर कंगनाने उर्मिलावर निशाणा साधला आहे. उर्मिलाला निश्चितच तिच्या अभिनयासाठी कोणी ओळखत नाही. ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. तिला निवडणुकीचं तिकीट मिळू शकतं तर मला तिकीट का मिळणार नाही, असं कंगनानं मुलाखतीत म्हणाली. उर्मिलाने तिच्या मुलाखतीत माझा अपमान केल्याचा आरोप कंगनानं केला आहे.   

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे सेवन करणाऱे कोण कलाकार आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी कंगनाकडे उर्मिलाने केली होती. कंगनाने पुढे येऊन ही नावे कोणती आहेत. ते सांगावे.. या चित्रपट क्षेत्राला मदत करावी, त्यामुळे याला आळा कसा बसविता येईल. याचा विचार करावा, असं उर्मिलानं म्हटलं होतं.  लाखों भारतीयांचं पोट मुंबई भरते. त्यांना प्रसिद्धी देते, मुंबईविषयी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजं. मुंबईची तुलना पाकिस्तानशी करू नये, असं टि्वट कंगनानं केलं होतं. सारा देश ड्रग्जमुळे त्रस्त आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचं उगमस्थान आहे, हे कंगनाला माहित आहे का, ड्रग्जच्या विरोधात कंगनाने तिच्या राज्यातून (हिमाचल प्रदेश) लढा देण्याची सुरवात केली पाहिजं असं उर्मिलानं एका मुलाखतीतं म्हटलं होतं. 
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख