मी येताना महापूर घेऊन आलोय अन् मी गेल्याशिवाय ते थांबणार नाहीत, असे समजू नका‌!

मी केदारनाथहून आलो आहे.
Don't think that I have brought floods from Uttarakhand : Governor
Don't think that I have brought floods from Uttarakhand : Governor

सांगली : मी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यानंतर इथे आपत्ती वाढल्या आहेत. महापूर येत आहेत, असे समजू नका. मी उत्तराखंडहून आलो आहे, त्या भागात महापूर नेहमीचाच आहेत, त्यामुळे मी येताना महापूर घेऊन आलोय आणि मी गेल्याशिवाय महापूर थांबणार नाहीत, असे तुम्ही समजू नका, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशि‍यारी यांनी केले. (Don't think that I have brought floods from Uttarakhand : Governor)

सिनेअभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांच्या ट्रस्टतर्फे सांगली जिल्ह्यातील एक हजार मुलीचे सामुदायिक विवाह आणि एक हजार मुलींच्या नावे सुकन्या सहाय्य योजनेच्या माध्यमातून ५० हजारांची ठेव ठेवण्यात आली आहे. त्यातील पाच मुलींना राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते ठेव पावती वाटप करण्यात आली. त्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. 

कोशियारी म्हणाले की, मी केदारनाथहून आलो आहे. महापुरात तेथे पाच हजार लोकांची हानी झाली होती. आमच्याकडचा महापूर खूप भयंकर असतो. त्याला धैर्याने तोंड द्यावे लागते. पूरग्रस्तांनो खचू नका, मीही अशी संकटे येणाऱ्या भागातील असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, केंद्र व राज्याच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा. शंभर टक्के अंमलबजावणी करा. लोक ताकदीने उभे राहतील. पंतप्रधानांना अपेक्षीत असलेला भारत आत्मनिर्भर बनेल. जगात देश पहिल्या क्रमांकावर येईल. आपत्तीत निसर्ग सर्वांचीच परीक्षा घेतो. सर्वांनी धैर्य राखून एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे. भारतात सामाजिक कार्याची परंपरा प्राचिन आहे. त्याच परंपरेशी नाते सांगणारे दीपाली सय्यद यांच्या ट्रस्टमार्फत होत असलेले कार्य पुण्याचे आहे. पैसे अनेकजण मिळवतात. मात्र उपयोग सत्कार्यासाठी करणे महत्वाचे आहे. पूरग्रस्तांना उभारी देण्यात ट्रस्टने वाटा उचलला. असाच प्रत्येकाने उचलावा. अशा कार्याचा गौरव शासन पातळीवरही झाल्यास आणखी लोक मदतीसाठी पुढे येतील. राजकारणात पराभूत झाल्यानंतर लोक थांबतात, मात्र दीपाली यांनी चांगले काम सुरु ठेवलेय. त्या अशाच काम करत राहिल्या तर राजकारणताही यशस्वी होतील.’’
 
प्रोटोकॉलबाबत पोलिसांना कानपिचक्या

कार्यक्रमाचे संयोजक अभिनेत्री दीपाली सय्यद, खासदार धैर्यशील माने यांनी प्रोटोकॉलबाबत नाराज व्यक्त केली. त्यावर राज्यपाल कोशि‍यारी यांनी कडक बंदोबस्ताबद्दल पोलिसांना काचपिचक्या दिल्या. मी लोकांत मिसळणारा आहे. मात्र नोकरीच्या भीतीने प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात असेल, असेही राज्यपाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com