'ससून'मधील डॅाक्टर्स आंदोलनाच्या पवित्र्यात...हीन दर्जाच्या पीपीईकिटमुळे डॉक्टरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले - Doctors at Sassoon Hospital will protest | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

'ससून'मधील डॅाक्टर्स आंदोलनाच्या पवित्र्यात...हीन दर्जाच्या पीपीईकिटमुळे डॉक्टरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

विविध मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा  'मार्ड'ने दिला आहे.

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय यामध्ये शिकाऊ निवासी डॉक्टर्स यांच्या 'मार्ड' संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. विविध मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा  'मार्ड'ने दिला आहे.  याबाबत आज राज्यस्तरीय बैठक होऊन निर्णय घेण्याची शक्यता  आहे. 
 
ससून मधील वाढत्या बेड च्या प्रमाणात कोविडसाठी कंत्राटी डॉक्टर्स, स्टाफ,तंत्रज्ञ यांची तातडीने यांची नेमणूक करावी, अंत्यत हीन दर्जाच्या पीपीईकिट मुळे डॉक्टर्समध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे चांगल्या दर्जाचे पीपीई किट देण्यात यावे, निवासी डॉक्टर्स यांचे 1वर्षांपासून थांबलेले विशेषज्ञ विभागाचे शिक्षण पूर्ववत करावे, 1वर्षांपासून थांबलेल्या नियोजित शस्त्रक्रिया व अतिविशेषपचार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरु करावेत आदी मागण्या या डॅाक्टरांच्या आहेत.

या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मार्ड संघटनेकडून कडक पाऊले उचलण्यात येतील व त्याची संपूर्ण जबाबदारी  सरकारची राहील, असा इशारा या संघटनेने दिला आहे. 

पुणे  शहरातील पावणेतीन लाख व्यक्तींवर दंडात्मक कारवाई 
 कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर, प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करण्याची शिस्त पाळलीच, असे वारंवार बजावूनही पुणेकर आणि जिल्ह्यातील नागरिक या शिस्तीचे पालन करत नसल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. यानुसार गेल्या वर्षभरात आज अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार ३१९ व्यक्तींकडून तब्बल २८ कोटी ११ लाख ९१ हजार १३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पुणे शहरातील २ लाख ८० हजार ८१४ नागरिक आहेत. या सुमारे पावणेतीन पुणेकरांकडून १७ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे याचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनाकडून मास्कच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून कारवाई करण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख