द्रमुक अन् अण्णाद्रमुकमधील दुश्मनीचा अस्त होणार? स्टॅलिन पर्व सुरू...

पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
DMK Chief M K stalin takes oath as tamilnadu chief minister
DMK Chief M K stalin takes oath as tamilnadu chief minister

चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात मागील अनेक दशकांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर दुश्मन म्हणून राजकारणात वावरले आहेत. त्यामुळे अनेकदा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाही झाली आहे. शपथविधीवर बहिष्कार टाकण्यापासून आमदारांशी न बोलण्यापर्यंतचा वाद होत राहिला आहे. पण नवे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे या दुश्मनीचे रुपांतर दोस्तीत करणार का? याची तमिळनाडू मोठी उत्सुकता आहे. (DMK Chief M K stalin takes oath as tamilnadu chief minister)

पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 33 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. आज स्टॅलिन यांच्या रुपाने तमिळनाडूत नवीन पर्व सुरू झाले आहे. स्टॅलिन यांनी मागील काही वर्षांपासून विरोधकांशी कट्टरता ठेवलेली नाही. जयललिता यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित राहिले होते. आताही माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी सोबत येऊन काम करू, अशी साद त्यांना घातली. त्यामुळे स्टॅलिन यांच्याकडून दोस्तीचा हात पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दोस्ती ते दुश्मनीची सुरूवात

तमिळनाडू जवळपास 50 वर्षांचे राजकारण डीएमके व अण्णाद्रमुक या दोन पक्षांती कटूतेभोवतीच फिरत राहिले आहे. याची सुरूवात सुपरस्टार एमजी रामचंद्रन यांनी 1972 मध्ये द्रमुकमधून बाहेर पडल्यानंतरझाली. त्यांनी अण्णाद्रमुक हा वेगळा पक्ष काढला. तेव्हापासून एमजीआर आणि करूणानिधी यांची दोस्ती संपली अन् तमिळनाडूच्या राजकारणात दुश्मनीचा उदय झाला. पुढील पाच वर्षांत एमजीआर सत्तेत आले. सलग दहा वर्ष ते मुख्यमंत्री होते. एमजीआर यांच्या निधनानंतर जयललितांनी त्यांची जागा घेतली. 

करूणानिधींना मध्यरात्री केले होते अटक

1989 मध्ये करूणानिधी मुख्यमंत्री झाल्यानंतर जयललितांशी त्यांचे वाद कायम राहिले. विधानसभेत हिंसा झाल्याची घटनाही या कालावधीत घडली. जयललिता यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप करत रडत बाहेर पडल्या होत्या. 2001 मध्ये सत्तेत आल्यानंतर जयललिता यांनी भ्रष्टाचारप्रकरणी करूणानिधी यांना मध्यरात्री अटक केली होती. जवळपास एक आठवडा ते तुरूंगात होते. दोन्ही पक्षांतील दरी एवढी वाढली होती की, दोन्ही पक्षांचे आमदार एकमेकांशी बोलतही नव्हते. 

2016 मध्ये दुश्मनी दोस्तीत बदलण्यास सुरूवात

जयललिता यांच्या 2016 मध्ये झालेल्या शपथविधी समारंभाला एम. के. स्टॅलिन यांची हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या पक्षातील बहुतेक आमदारांनी बहिष्कार टाकला होता. जयललिता यांच्या निधनानंतर दोन्ही पक्षांतील दरी कमी होत गेली. मुख्यंमत्री पलानीस्वीमी व विरोधी पक्षनेते स्टॅलिन यांच्यामध्ये विकासाकामांविषयी चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला बहुमत मिळाल्यानंतर पलानीस्वामी यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. स्टॅलिन यांनी मोकळेपणाने त्याचा स्वीकार करत एकत्र काम करण्याचे आवाहन केले. स्टॅलिन पर्वाची ही सुरूवात तमिळनाडूच्या राजकारणातील दुश्मनीचे पर्व संपवणार का, हे पहावे लागेल.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com