भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; बंडाचा झेंडा उगारला - Dispute in Mira Bhayander over BJP district president  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; बंडाचा झेंडा उगारला

संदीप पंडित 
बुधवार, 23 जून 2021

चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाकडे आता सारे लक्ष  लागले आहे.  

विरार : मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली आहे. व्यास यांच्या निवडीला माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.  जिल्हाध्यक्ष बदलला नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठे नुकसान होईल, असा इशारा पक्षाला देत बंडाचा झेंडा उगारला आहे. Dispute in Mira Bhayander over BJP district president

मीरा भाईंदरमध्ये एक काळ होता, त्यावेळी दोन्ही काँग्रेस मीरा भाईंदरवर राज्य करत होते. परंतु नरेंद्र मेहता यांच्या उदयानंतर मात्र येथील राजकीय  बदलली आणि  पालिकेवर आपले वर्चस्व स्थापन केले. आज नरेंद्र मेहता भाजपाच्या परिघाबाहेर असले तरी आज हि भाजपमध्ये त्यांचाच दबदबा असल्याचे दिसून येते. त्यामुळेच काल त्यांच्या विरोधी गटातील रवी व्यास यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर आज मेहता गटातील जवळपास ५० नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकविल्याने  भाजपचा राजकीय "व्यास" कमी होणार कि, : व्यास " च परिघा बाहेर जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 
मीरा भाईंदरमध्ये भाजप म्हणजेच नरेंद्र मेहता आणि नरेंद्र मेहता म्हणजेच भाजप असे समीकरण नरेंद्र मेहता यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजप सोडला असला तरी आज हि त्यांचेच वर्चस्व मीरा  पालिकेवर असल्याचे दिसून येत आहे. मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांचा उदय झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पहिल्यांदा स्व. गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हात दिला. तो हात त्यांनी अजूनही सोडलेला नाही त्यामुळेच काल प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत  दादा पाटील यांनी हेमंत म्हात्रे यांच्या जागी अध्यक्ष म्हणून नरेंद्र मेहता यांच्या विरोधी गटातील रवी व्यास यांच्या नावाची घोषणा केल्यावर नरेंद्र मेहता पहिली धाव घेतली ती माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. या समर्थकांना दोन दिवस थांबण्याचा सल्ला त्यांनी दिला असून आता सारे लक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. 

जर रवी व्यास यांना अध्यक्षपदावरून न हटवल्यास राजीनामा अस्त्र मेहता समर्थकांनी बाहेर काढल्याने यावर भाजप मध्ये मोठे चिंतन सुरु झाले आहे. एक तर राज्यातील सत्ता गेली असताना आता  सत्ता एका अध्यक्षपदावरून जाऊ नये, यासाठी प्रदेश नेतृत्वाला विचार करावा लागणार आहे. सध्या तरी रवी व्यास यांच्या बरोबर जास्त नगरसेवक नसल्याने त्यांना बाजूला केल्यास  तेवढा फटका बसणार नाही, असे बोलले जात आहे. परंतु अध्यक्ष न हटविल्यास येथील सत्ता मात्र हातची जाण्याचा धोका असल्याने आता भाजप नेतृत्व काय निर्णय घेते या कडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पुढच्यावर्षी पालिकेच्या निवडणुका हि होणार असल्याने नरेंद्र मेहतांना पेक्षा त्यांना गोंजारनेच भाजपच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.  यावेळी हि ९५ नगरसेविकापैकी भाजपचे ६१ नगरसेवक निवडून आणण्यात नरेंद्र मेहता यांचे योगदान महत्वाचे होते. आजही नरेंद्र मेहता यांना आव्हान देणार नेतृत्व भाजपकडे नाही. आमदार गीता जैन ह्या भाजपला सोडून शिवसेनेच्या सहयोगी सदस्य झाल्याने आणि हेमंत म्हात्रे यांना पदावरून हटविल्याने भाजपला रवी व्यास यांनाही हटवण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याने  एकदा मीरा भाईंदर भाजपवर नरेंद्र मेहता  वर्चस्व असल्याचे दिसून येणार आहे. त्यातच ७ जुलैला मेहता यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा  मेहता यांची भाजप मध्ये घरवापसी होण्याचे संकेत मिळत असून त्यांना आता थेट प्रदेश कार्यकारणीवर घेण्याच्या हालचाली सुरु आहे.  
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख