महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस..

नवी मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
nm7.jpg
nm7.jpg

मुंबई : नवी मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.  

याबाबत नवी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 70 हून अधिक जागा पाहिजे आहेत. तर काँग्रेस 25, तर राष्ट्रवादी काँग्रेस 35 जागा पाहिजे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेकडे अधिक जागेची मागणी केली आहे. 

नवी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद कमी आहे, म्हणून शिवसेना त्यांना विचारात घेत नाही, अशी चर्चा आहे. नवी मुंबईतील सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. 
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरणार आहे. त्यामुळे ही निवडणुक अधिक रंगतदार होईल, याच शंका नाही.

हेही वाचा : देशात उपलब्ध वस्तू अधिक महाग होणार..  

मुंबई : "करदात्यांवर सरकारचा विश्वास आहे, त्यादृष्टीने पावलं उचलली आहेत. निर्यात वाढवण्यासाठी जागतिक पातळीवर सहभागी होणे गरजेचं आहे. जे साहित्य भारतात मिळत नाही ते आयात करावंच लागेल, मात्र जे देशात उपलब्ध आहे, ते अधिक महाग करीत आहोत. सप्टेंबरमध्ये याबाबत निर्णय होईल," असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सांगितलं. सीतारामण मुंबई दैाऱ्यावर आहेत.

निर्मला सीतारामण म्हणाल्या की कोरोना काळात महिला, दिव्यांग यांना अधिक सुविधा देऊ शकलो असतो, पण काही मर्यादा होत्या. कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे. प्रथम जीव वाचविणे, त्यानंतर उद्योगविश्व वाचवण्याचं आव्हान होतं. आम्ही अधिकाधिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कोरोना काळात खूप काम केलं, जनतेनं एकत्र येऊन मदतीचा हात दिला. विकसित देश संघर्ष करीत आहेत. भारत कोणत्याही परिस्थितीत संकटाशी सामना करण्यास तयार असतो. आपली संपूर्ण स्वदेशी कोरोना लस 100 देशात पोहचली आहे. 

निर्मला सीतारमण म्हणाल्या की कर योग्य ठिकाणी आणि विकासासाठी खर्च होईल. टॅक्स भरण्याबाबत मुंबई खूप अलर्ट आहे. कर दात्यांवर सरकारचा विश्वास आहे, त्यादृष्टीने पावलं उचलली आहेत. निर्यात वाढवण्यासाठी जागतिक पातळीवर सहभागी होणे गरजेचे आहे. जे साहित्य भारतात मिळत नाही ते आयात करावंच लागेल, मात्र जे भारतात उपलब्ध आहे, ते अधिक महाग करीत आहोत. सप्टेंबरमध्ये याबाबत निर्णय होईल
.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com