हिंगोलीत सत्ताधारी शिवसेना व भाजप आमदारामध्ये जुंपली  - Dispute between Shiv Sena MLA Santosh Bangar and BJP MLA Tanhaji Mutkule | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

हिंगोलीत सत्ताधारी शिवसेना व भाजप आमदारामध्ये जुंपली 

संदीप नागरे 
शनिवार, 24 एप्रिल 2021

आमदार संतोष बांगर व  आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष पेटला आहे.

हिंगोली : हिंगोलीमध्ये सत्ताधारी शिवसेना आमदार संतोष बांगर व भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष पेटला आहे. शिवसेना आमदार बांगर हे गरजू रुग्ण व  नातेवाईकांना कोरोनाच्या कठीण काळात चार महिन्यांनपासून, ऑक्सीजन बेड या सह रेमडीसिविर इंजेक्शन पुरवठा करत आहेत. 

नागरिकांचे आलेले फोन कॉल  रेकॉर्ड करून, सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.  मात्र आमदार बांगर यांच्याकडे रेमडीसिविर इंजेक्शन कुठून आले याची चौकशी करण्याची मागणी भाजपने करत उपोषण सुरू केले.   भाजप नेते माजी आमदार गजानन घुगे यांनी  या सगळ्या प्रकरणाची  विशेष चौकशी करण्याची  मागणी केली, मात्र  यावर स्पष्टीकरण  देताना आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने रुग्णांची सेवा करत असून,  इंजेक्शन सह इतर औषधी प्रशासनाकडून रुग्णांना उपलब्ध करून देत असल्याचे सांगत लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरात राहावे म्हणून सोशल मीडियावर मला आलेले फोन कॉल हे  रेकॉर्ड करून व्हायरल करत असल्याचे आमदार  

हेही वाचा  :  कोरोना काळात न दिसल्याच्या कारणाने आमदाराला जिवंतपणी श्रद्धांजली : गुन्हा दाखल
 
नागपूर : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असताना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ते हरवले असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होत्या. त्यातच एकाने त्यांना श्रद्धांजलीसुद्दा अर्पण केली. त्यामुळे चिडलेल्या आमदाराने थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. ग्रामीण भागातही झपाट्‍याने करोनाचे संक्रमण वाढले आहे. मात्र लोकप्रतिनिधी दिसत नसल्याच्या तक्रारी आहे. बेड्‍स, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हिर मिळत नसल्याने जनता हतबल झाली आहे. अशा परिस्थितीत कामठीचे आमदार काहीच मदत करीत नाही. ते दिसत नाहीत आणि तक्रारीची दखलही घेतल नसल्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे एका संतप्त नागरिकाने आमदार टेकचंद सावरकर हरवले असल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच संधी मिळाली. ही पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. यात एकाने व्हाट्‍ॲपवर चक्क आमदाराला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आमदार चांगलेच संतापले. प्रीतम व त्याच्या दोन साथीदाराच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत विचारणा केली असताना सावरकर यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचे सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख