Sarkarnama Banner - 2021-07-10T151842.858.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-10T151842.858.jpg

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यातच धुडगुस!

पोलिस निरीक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाली

उस्मानाबाद : काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, यासाठी त्यांनी कुठलाही परवाना घेतला नव्हता. यामुळे पोलिसांनी हे आंदोलन परवाना नसल्याचे कारण देत अडवले याचा राग मनात धरून सर्व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन गोंधळ घातला. Dispute between Osmanabad Congress office bearers and police

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. 'अटक करा, अटक करा' असे म्हणत पोलिस ठाण्यात प्रवेश केला. दरम्यान पोलिस निरीक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी कुठली कारवाई आम्ही करणार नसून काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने त्याच्यावर कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवन यांनी स्पष्ट केले आहे.

मोदीजी, मंत्री बदलण्यापेक्षा इंधन दर कमी करा!
जळगाव : ''मोदी सरकार हाय.. हाय.., इंधनाचे दर कमी करा'' अशा घोषणा देत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे आज महागाई विरोधात सायकल रॅली काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला. जळगाव जिल्हा काँग्रेस भवनापासून या सायकल यात्रेस सुरुवात झाली, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. ''मोदी सरकार हाय.. हाय.., इंधनाचे भाव कमी करा,'' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले.

लोणावळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल लोणावळा येथे काँग्रेस कार्यक्रर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी नाना पटोले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी पटोले बोलत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com