संभाजीराजे अन् उदयनराजे यांच्यात वाद पेटवला जातो आहे.. - Dispute is being created between Sambhaji Raje and Udayan Raje. | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजे अन् उदयनराजे यांच्यात वाद पेटवला जातो आहे..

तुषार रूपनवर
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

छत्रपतींच्या घरात फूट पाडू नका. हे सर्व राजे आपले आदरणीय व्यक्तीमत्व आहे.

मुंबई : "छत्रपतींच्या घरात फूट पाडू नका. हे सर्व राजे आपले आदरणीय व्यक्तीमत्व आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी मोठं कॅम्पेन चालवल होतं. स्वत: संभाजीराजे यांनी आझाद मैदानात जाऊन संवाद साधला होता. छत्रपती उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाला दिशा दिली होती, त्यांनी मूक मोर्चा काढले होते. मात्र, आता काही जण जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा बांधवांच्या जखमेंवर मीठ चोळण्यासाठी परिस्थिती निर्माण करू नये. सारथी संस्था सरकारने संपवली आहे. सारथी संस्था मराठा समाजाच्या तरूणांसाठी काम करते. ती संस्था पुन्हा जिवंत केली पाहिजे. मराठा समाजाच्या तरूणाई मध्ये नैराश्य निर्माण केलं जात आहे.

मराठा आरक्षणाची बाजू आशुतोष कुंभकोणी यांच्या ऐवजी माजी महाधिवक्ता थोरात यांनी बाजू मांडावी, असा सोलापूरच्या परिषदेत ठराव झाला होता. मी थोरात साहेबांना बोलून चर्चा केली. माजी महाधिवक्ता थोरात यांच्या टिमला सरकारने पुढे जबाबदारी दिली गेली. काही लोकांना असं वाटत माझी जात ब्राम्हण आहे, म्हणून माझ्या माथी मारल जात. मात्र त्यात काहीही तथ्य नाही. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांना भेटलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही लोक चांगल्या भावनेने जात आहेत, तर काही जणांना हे आरक्षण केंद्राकडे टोलवायचे आहे, असं फडणवीस म्हणाले. 

पोलीस भरतीबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “आजच करायची असेल तर चर्चा करा, मार्ग काढा. मराठा समाजाला आश्वस्त करा. अशी कोणतीही चर्चा न करता इतक्या गंभीर परिस्थितीत हा निर्णय घेतला जात आहे. राज्यकर्त्यांनी निर्णय घेताना परिणाम काय होणार आहेत याचा विचार केला पाहिजे. पोलिस भरती करावी लागणारच आहे, ती थांबवता येणार नाही. पण आता लगेच ती करण्याची घाई नाही. सुप्रीम कोर्टात सध्या मराठा आरक्षणावर काय होणार आहे, स्थगिती हटवू शकणार आहोत का? हे महत्त्वाचं आहे. याला एक महिनाच लागणार आहे. एक महिना उशिरा भरती झाली तर काही नुकसान होणार नाही. पण आधी झाली तर निश्चितच नुकसान होणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे.” 
 
...मराठा आरक्षणाशिवाय पोलिस भरती नको..
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 
  
..तो पर्यंत नोकरभरती नको : संभाजी ब्रिगेड 
मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे या समाजातील मुलांसमोर मोठा प्रश्न उभारला आहे, त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतीही नोकरभरती सरकारने करू नये, अशी मागणी  संभाजी ब्रिगेडने केली आहे. समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे, या बाबत सरकारला जाग यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या नेतृत्त्वाखाली लाल महालसमोर नुकतेच मशाल आंदोलन करण्यात आले.  
 Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख