खानदेशला मिळणार गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा मान?

मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
 Chandrakant Patil .jpg
Chandrakant Patil .jpg

जळगाव : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपकडून (BJP) मुख्यमंत्रिपदासाठी चार नावांवर खल सुरू आहे. (Discussion of Chandrakant Patil's name for the post of Chief Minister of Gujarat) 

रुपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, पर्यायाने मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने आज (ता.12) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भाजप संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर येथे आज होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.  

यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. ते सुरतचे खासदार आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुरत शहराच्या विकासात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. शहरातील वस्त्रोद्योग आणि हिरे उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. पाटील हे मूळ महाराष्ट्रातील खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. खानदेशला महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाने नेहमी हुलकावणी दिली आहे. गुजरात राज्य तो मान मिळवून देणार काय? याकडेच आता लक्ष आहे.

पाटील यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिम्प्री अकाराउत या गावचे मूळ रहिवासी आहेत. आजही त्यांची या गावाशी नाळ जुळली आहे. या ठिकाणी ते येत असतात. या शिवाय जळगाव येथे त्यांचे निवासस्थान आहे. जळगाव येथून सुरत येथे ते कामासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी जनतेत संपर्क वाढविला व ते सुरत महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक झाले. त्यानंतर महापौर, आमदार, खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशी त्यांनी मजल गाठली आहे. तर त्यांच्या पत्नी आरती पाटील याही आता आमदार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ते विश्वासू मानले जातात. त्यामुळे त्यांचे नाव आता गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदी चर्चेत आहे. त्यांची नियुक्ती झाल्यास मराठी माणूस गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल. महाराष्ट्र आणि खानदेश ला हा बहुमान मिळेल. महाराष्ट्र राज्याने खानदेशाला मुख्यमंत्री पदाबाबत हुलकावणी दिली आहे. बाळासाहेब मधुकरराव चौधरी, धुळे येथील रोहिदास दाजी पाटील, आणि आता एकनाथराव खडसे यांची वर्णी लागली नाही. मात्र, आता गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तरी खानदेशला मान मिळणार का? या कडेच लक्ष लागले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com