धनंजय मुंडे, कृष्णा हेगडे, धुरी आणि आणखी आता चौथा... - dhananjay munde krushna hegde, dhuri and fourth person find in lady case | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे, कृष्णा हेगडे, धुरी आणि आणखी आता चौथा...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधित महिलेवर प्रत्यारोप 

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेच्या विरोधात आता काही मंडळी बोलू लागली आहेत. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी या महिलेने `हनी ट्रॅप`मध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर याच महिलेकडून असाच प्रयत्न मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबत घडल्याचे उघड झाले. ही तीन प्रकरणे समोर आलेली असतानाच आणखी एक उघड झाले आहे.

जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नामक तरुणाच्या विरोधातही अशीच तक्रार संबंधित महिलेने दिल्याचे म्हटले आहे. या तरुणाची सोशल मिडीयावरून ओळख झाली. त्यानंतर मैत्री, त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले. हे जवळपास दोन वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची व बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. 

या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता, रिझवान कुरेशी या जेट एअरवेज कम्पनी मधील एका अधिकाऱ्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिला मे 2018 मध्ये संपर्कात आली. अखेर याच रिझवान विरुद्ध रेणू शर्मा हिने पोलिसात विनयभंग व बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. ही महिला सोशल मीडियावरील स्टार मेकर या चायनीज अँप वर गायनाचे काम करते.

काय म्हणाले होते हेगडे? 

"संबंधित महिला ही मला 2010 पासून संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होती. वेगवेगळ्या नंबरवरून मला फोन आणि व्हॉट्‌स ऍप मेसेज करायची. हे हनिट्रॅपचे प्रकरण आहे, हे लक्षात आल्यानंतर तिला टाळण्याचा प्रयत्न केला. पण, ती पाच ते सहा वर्षे माझा पिच्छा पुरवत होती. पण मी तिला दूर ठेवले,'' असा दावा भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला. 

"तिने मला "आप मुझे भूल गये क्‍या?' असा मेसेज सहा आणि सात जानेवारी 2021 रोजी पुन्हा केला. त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला मुंडे यांचे प्रकरण बाहेर आले. मला वाटलं की अशी जी लोकं आहेत, जी दुसऱ्याला ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड करण्यासाठी मी एवढ्या वर्षांनी बाहेर येऊन हे सांगत आहे. कारण, आज ते मुंडे यांना फसवत आहेत, ते उद्या दुसऱ्या कोणाला फसवतील. ते रोखण्यासाठी मी हे सांगत आहे. यात कोणतंही राजकारण नाही. मला जो अनुभव आला, तो मी सर्वांसमोर मांडला,'' असे हेगडे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख