धनंजय मुंडे जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या पेटीवर बसतात.. - Dhananjay Munde interacts with porters at CST railway station | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या पेटीवर बसतात..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राज्याचे वजनदार मंत्री आपल्या सोबत बसून गप्पा मारल्या. अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढले.

मुंबई : राज्याच्या विरोधीपक्षनेतेपदी असताना मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर (हमालांचे बसण्याचे एक ठराविक ठिकाण) ९० च्या दशकात स्व. गोपीनाथ मुंडे बसत असत, त्याच पेटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना स्थानकावरील हमाल मंडळीनी बसण्याचा आग्रह केला. धनंजय मुंडे त्याच पेटीवर बसून येथील हमाल मंडळींशी मनमोकळ्या गप्पा केल्या.

धनंजय मुंडे यांनी सीएसटी स्थानकावरील हमाल मंडळींना व अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, सर्वांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले; यावेळी हमाल मंडळींनी कृतज्ञता व्यक्त केली. धनंजय मुंडे हे लातूर-बीड जिल्हा दौऱ्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानाकावरुन मुंबई - लातूर एक्सप्रेस रेल्वेने प्रवासासाठी निघाले होते. रेल्वेच्या निघायच्या काही मिनीटे आधी ते सीएसटी स्थानकावर आले असता, येथील हमाल मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधला. 

गोपीनाथराव मुंडे विरोधीपक्षनेतेपदी असताना वेटिंग रूम मधील ज्या पेटी वर बसायचे त्याच पेटीवर धनंजय यांनी पुन्हा बसण्याचा आग्रह केला. धनंजय मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पेटीवर बसून सर्व हमाल मंडळींशी संवाद साधला. यावेळी राज्याचे वजनदार मंत्री आपल्या सोबत बसून गप्पा मारल्या. अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढले. यावेळी धनंजय मुंडे यांनीही सर्वच हमाल मंडळी व अन्य कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले.  

संबंधित लेख