धनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आश्वासन.. - Dhananjay Munde assurance to Leader of Opposition Praveen Darekar  | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आश्वासन..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

सामाजिक न्याय विभागातील काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी दरेकर यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली.

मुंबई : आकुर्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणी, रामनगर-सावरगाव येथे मुलींचे वसतीगृह चालवणे, कांदिवलीच्या नालंदा बुद्ध विहाराची पुनर्बांधणी आणि मागठाणे येथील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांना मंजुरी देणे याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले.

सामाजिक न्याय विभागातील काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी दरेकर यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी गेले काही दिवस सामाजिक व न्याय विभागाशी संबंधित असलेल्या विविध मागण्यांचा पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या मागण्यांबाबत त्यांनी या भेटीत प्रत्यक्ष सविस्तर चर्चा केली.

संबंधित लेख