करुणा मुंडे पिस्तुल प्रकरणावर फडणवीस म्हणाले...  

परळी शहरात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.
 Devendra Fadnavis .jpg
Devendra Fadnavis .jpg

मुंबई : परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्या कारमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा मुंडे यांचा दर्शनासाठी आलेल्या महिलांशी वाद झाला. यावेळी काही महिलांनी करूणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Devendra Fadnavis's reaction on Karuna Munde case) 

देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाल बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून कोणला वंचित ठेवण्याचे कारण नाही. परळीमध्ये जे काही घडले आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत ते आणि पिस्तुल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे'' अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने लूकआऊट नोटीस काढली असल्याची माहिती मला माध्यमांकडूनच मिळाली. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला आहे.  त्यामुळे त्यांनी आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरे जावे तेच योग्य ठरेल, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, करुना शर्मा व मोरे (दोघेही रा. मुंबई) यांच्या विरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आज या दोघांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

परळी शहरात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपुर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.

त्यानूसार करूणा मुंडे या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलाशी बाचाबाची झाली. यावेळी करूना मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न  केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी करुणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com